Header Ads

उमराणी जि.प.शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात


 
उमराणी जि.प.शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात

उमराणी,वार्ताहर : उमराणी ता.जत येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड मुलींच्या शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन व विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्या सौ.मंगलताई नामद यांच्याहस्ते करण्यात आले.माजी पंचायत समिती सदस्य मल्लेश कत्ती,स्वा.शे.संघटना तालुकाध्यक्ष शंकर गदग,संरपच सौ.जयश्री सिंदूर,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मल्लिकार्जुन कोळी,उपाध्यक्ष महादेवी सुतार, ग्रा.प.सदस्यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी भजन,धनगरी ओव्या,जागरण गोंधळ, गोपाळकाला,हिंदी मराठी चित्रपटातील व देशभक्तिपर गीते, बालगीते, नाताळ गीत आदी गीतांवर वैयक्तिक व सामूहिक नृत्य सादर करून पालकांची मने जिंकली.शाळेच्या मुख्याध्यापकासह सर्व शिक्षकांनी कष्ट घेतले.
 

 

उमराणी ता.जत येथील जि.प.शाळेतील स्नेहसंमेलनात नृत्य सादर करताना विद्यार्थी
 


 

Blogger द्वारे प्रायोजित.