Header Ads

| जत | जत तालुक्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढली | प्रशासनाकडून उपाययोजना गरज |


 


मू

जत,प्रतिनिधी : उपविभागातील  पुर्व भागातील अनेक  गावांमध्ये फेब्रवारी महिन्याच्या शेवटच्या आवठड्यात पाणीटंचाईची तीव्रता जाणवू लागली आहे.गत पावसाळ्यात तालुक्याच्या काही भागात चांगला पास पडल्याने पाणी टंचाईची तीव्रता कमी आहे मात्र माडग्याळ, जाडरबोबलाद,सोन्याळ,लकडेवाडी,अंक लगी भागात अत्यल्प पाऊस पडला होता.त्यामुळे त्या परिसरासह पुर्व भागातील अनेक गावात पाणी टंचाईची ओरड ऐकावयास मिळत आहे.येत्या महिन्याभरात त्याची तीव्रता वाढणार आहे.त्यामुळे प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे.

जत तालुक्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नदी, नाले फेब्रुवारी महिन्यातच आटले असून,मार्च महिन्याच्या सुरूवातीला अनेक हातपंप बंद पडले तर विहिरींनी तळ गाठला. गावागावातील नळयोजनाही अखेरच्या घटका मोजत आहेत. अनेक गावात नळयोजनेचे पाणी आठ ते 10 दिवसा आड मिळत आहे. अशा परिस्थितीत पाण्यासाठी गावकरी भटकंती करीत आहेत.जत तालुक्यातील संख,उमदी भागात पाणीटंचाईची सर्वाधिक तीव्रता जाणवत आहे. गावागावातील नागरिक पाण्यासाठी भटकंती करती आहेत. नळयोजना कुचकामी ठरल्या आहेत.त त्यामुळे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गत दोन महिन्यांपासून या भागात भीषण पाणीटंचाई आहे.पुर्व भागातील अनेक गावाना पाणीटंचाईचा जबर तडाखा बसत आहे. 


 

Blogger द्वारे प्रायोजित.