Header Ads

| लेख | कागदे जमविणारी माणसे कमी झाली | एन.के.वळसंग |


 




 

कागदे जमविणारी माणसे कमी झाली

 

आपल्या ज्ञात गेल्या 10-12 वर्षात संगणक युग अर्थात डिजिटल दुनियेची धून वाजत आहे. संगणक नाही तर कोणतेही काम नाही असे दृढ व्याख्या बनून गेली आहे. कोणत्याही क्षेत्रात आता ऑनलाईन शब्दाशिवाय कामच होत नाही. आज कामे राहतील बाजूला पण ऑनलाइन संभाषण म्हणजेच कनेक्शन असे समजणारी नवीन समाज तयार झालं आहे म्हंटलं तर वावग ठरणार नाही. आजकाल सकाळ झाली की मोबाईल हातात घेतल की पाहिल्यादा डेटा सुरू करून ऑनलाईन येऊन मेसेज पासून नवीन विषय हातात हाताळायची जणू हौसचं. अनेक वर्षे झाली पंतप्रधान यांनी डिजिटल नावाच्या शब्दाला आणल्यापासून प्रत्येक माणसाचे काम असो किंवा कोणतेही संदर्भ असो इंटरनेट शिवाय काम होत नाहीत. गेल्या काळात एखादे काम करावयाचे असेल तर 100 कागद लागायची,16-17 पडताळणी व्हायच्या पण आता ऑनलाईन सिस्टीम मुळे वेळ तर वाचलेच,हेलपाटे पण कमी झाली. पण या युगात आपण या ऑनलाईन नामक प्रक्रिया किती सेफ किंवा किती यात घोडेबाजार होतो हे कळणे मात्र अशक्य. ऑनलाईन कामे झाल्याने सुखवस्तू म्हणून पाहणाऱ्या सर्वांना आपण केलेलं ऑनलाईन काम किंवा आपण आपल्या कामासाठी दिलेली दस्तऐवज किती सुरक्षित आहेत याची परिसीमा मात्र अस्पष्टच. 

ऑनलाईनच्या या गौडबंगाल खेळामुळे घरात संगणक असेल, इंटरनेट असेल तर कोणालाही ‘ऑनलाइन शॉपिंग’ची इच्छा ही होणारच! तसंही खरेदी ही कोणाची आवड, कोणासाठी अगदी व्यसन तर कोणासाठी ती डोकेदुखीचीही बाब असते. प्रसंगी आपण या खरेदी करण्याचा उद्देशाने बोगस साईट आपल्यासमोर लादल्या जातात आणि त्या नुसार आपण साईट आणि त्या मागणी नुसार आपली असणारी पर्सनल माहिती किंवा यात अकाउंट नंबर, आधार नंबर किंवा पॅन डिटेल्स आपण सेव्ह करतो पण पुढे आपल्याला जर वस्तू आवडली नाही तर आपण पर्यायी प्रोसेस रद्द करून सोडतो मग हे आपण भरलेली माहीती चोरली जाऊ शकत नाही का ? काही वेळा पैशाचे व्यवहार आपण करताना आपल्याला ओपीटी येते आणि मग त्या नंतर व्यवहार पूर्ण होतो. पण काही वेळा नेटवर्क मुळे प्रलंबीत झालेले व्यवहार पुन्हा नवीन नेटवर्क मध्ये नको असलेले व्यवहार पूर्ण झालेले अनेक उदाहरणे आहेत.

ऑनलाईन आज सुरक्षित की अ-सुरक्षित हा प्रश्न सर्वांच्या समोर पडतो.किंवा त्यात किती ठिकाणी घोडेबाजार होतो हा ही तितकाच महत्वाचा प्रश्न सर्व सामान्य किंवा आपल्यासमोर पडलेलं आहे. उदा. एखाद्या ऑनलाईन सर्व्हे मध्ये जर विहित माहिती भरली तर आपल्याला त्या योजनेचा लाभ मिळतो. पण ऑनलाईन सिस्टीम असल्याने काही माहिती अचूक भरली जाते व लाभार्थी म्हणून नसलेल्याला काही वेळा लाभ मिळतो आणि सामान्यांच्या वाटेला काही वेळा फक्त वाट पाहिल्याशिवाय काय पदरात पडत नाही. तर काही ठिकाणी ऑनलाईन ही उक्ती म्हणजे खरी डोकेदुखी बनते 10 रु. च्या कामाला संगणक बघून आपल्याला 100 रु. द्यावे लागतात. कागदी घोडे नाचले तरी चालतील पण गरिबांच तोंड लहान झालं की 10-20 कमी करून अगोदर काम व्हायची. पण आता ऑनलाईन म्हणजे दवाखाना झालाय संगणक वर काय होतंय कळत नाही आणि सांगेल तेवढं पैसे देऊन औषध घेतल्यासारख आपल्याला पैसे द्यावे लागतात. आणि त्या कामात किती खरे पणा किती खोटेपणा समजायला मात्र रस्ता नसतो. म्हणून ऑनलाईन जरूर एक वेळ चांगलं पण आज कागद जमावणारी माणस कमी झाली आणि त्यांची जागा संगणकने घेतली हाच फरक.

 

 

लेखन : एन.के.(पत्रकार)

 मो. 8806605852




 


Blogger द्वारे प्रायोजित.