Header Ads

शिक्षकांवर बेरोजगाराची कुर्हाड!



संख,(वार्ताहर): शिक्षक होण्यासाठी व रोजगाराचा प्रश्न सोडविण्याच्या उद्देशाने डीएड, बी.एड, पदवी धारण केलेल्या युवकांवर बेरोजगारीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. 15-20 वर्षांपूर्वी डीएड प्रशिक्षण पूर्ण झाल्याबरोबर हमखास नोकरी मिळायची. त्यामुळे बहुतांश तरुण तरुणींनी डीएड. प्रशिक्षण पूर्ण करून शिक्षक व्हायचे स्वप्ने पाहून पूर्ण करायचे. मात्र अलीकडच्या काळात केंद्र व राज्य शासनाने खिरापतीसारखे डीएड, बीएड कॉलेजेस वाटल्याने येथून निर्माण होणार्‍या पदवीधारकांची मोठी फौज निर्माण झाली आहे. परंतु शिक्षकाची नोकरी मिळत नसल्याने त्यांना आता मिळेल ते काम करावे लागत आहेत. अनेक डीएड, बीएड पदवीधारक पानटपरी, चहाची दुकाने चालवीत आहेत तर ज्यांच्याकडे शेती आहे ते शेतात काम करीत आहेत. तर काही डीएडधारक कॉन्व्हेंटमध्ये हजार दीड हजारात शिकवून उदरनिर्वाह करताना दिसत आहेत. पूर्वी याच डीएड धारकांना गुरुजी म्हणून मान मिळत होता. शिक्षक होऊन ग्रामीण भागात ज्ञानादानाचे काम डीएडधारक करीत होते. काही वर्षापासून डीएड, बीएड महाविद्यालये खिरापतीसारखे सरकारने वाटल्याने गल्लोगल्ली कॉलेजेस उघडले आणि डीएड धारकांची फौज तयार झाली आहे. पूर्वी 70 टक्क्यावर गुण प्राप्त विद्यार्थ्यांना डीएडला मोठ्या मेहनतीने प्रवेश मिळायचा. परंतु नवीन खाजगी डीएड कॉलेज सुरू झाल्याने कमी गुण असणार्‍यानाही प्रवेश मिळाला. त्यामुळे 


डि एड धारकांची संख्या लाखात गेली आहे.एवढ्या मोठ्या संख्ये गुरूजी झालेल़्यांना आता नोकरी मिळत नसल्याने ही अध्यापक विद्यालये बंद पडली आहेत.डीएड झाल्यानंतर शिक्षक होण्यासाठी शासनाने टिचर इलिजिबिलिटी टेस्ट (टीईटी) परीक्षेची अट घातली आहे. आता हीच परीक्षा बीएड धारक देऊ शकतात. त्यामुळे डीएड धारकांच्या समस्येत आणखीनच वाढ झाली आहे. अनेक डीएड पदवीधारक विद्यार्थी नोकरी मिळत नसल्याने मिळेल ते काम करीत आहेत.

Blogger द्वारे प्रायोजित.