Header Ads

मी यशस्वी होणारच असा दृढनिश्चय करा : प्राचार्य प्रमोद पोतनीस | सिध्दार्थ पब्लिक स्कूलच्या दहावीच्या विद्यार्थ्याना निरोप 





 

जत,प्रतिनिधी : प्रत्येक विद्यार्थ्याने मी यशस्वी होणारच असा दृढनिश्चय मनाच्या गाभाऱ्यात कोरुन ठेवावा.निश्चयी विद्यार्थीच जीवनात यशस्वी होतो,असे प्रतिपादन माजी प्राचार्य प्रमोद पोतनीस यांनी केले.जत येथील श्री.उमाजीराव सनमडीकर मेंडीकल फौडेशन,जतचे अंतर्गत सिध्दार्थ पब्लिक स्कूल(सी.बी.एस.ई )या शाळेचा इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्याचा पहिला निरोप समारंभ उत्साहात संपन्न झाला.त्यावेळी पोतनीस बोलत होते.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी प्राचार्य पोतनीस,तर प्रमुख उपस्थितीत संस्थेचे सचिव डॉ.कैलास सनमडीकर,स्कूलचे प्राचार्य डॉ.विल्सन थॉमस उपस्थित होते.

स्कूलच्या दहावी वर्गातील विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला.पाणावलेल्या डोळ्यांनी सर्व विद्यार्थ्यानी शाळेसह शिक्षकांचे आभार मानले.भविष्यात शाळेचे नाव उज्वल अशा पध्दतीने प्रगती करू असेही यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी मनोगतात भावना व्यक्त केल्या.प्राचार्य प्रमोद पोतनीस म्हणाले, पुस्तकी ज्ञानाबरोबरच जीवन जगण्याची कला ही आपल्याकडे असावी.प्रत्येक विद्यार्थी हा वेगळा असतो.आपल्यातील सुप्तगुण ओळखून त्यांना वाव द्या,निराशावादी जीवन न जगता आत्मविश्वासाने जीवन जगा,कष्टाला पर्याय नाही.असे विचार व्यक्त केले तसेच त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस,थॉमस एडीसन,बिल गेटस,मंगेश पाडगावकर या थोर व्यक्तीचे दाखले दिले व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

संस्थेचे डॉ.कैलास सनमडीकर म्हणाले,शाळेचे ब्रीद वाक्य अतः दिप भव याप्रमाणे विद्यार्थ्यांना स्वंय प्रकाशित होण्याचे आवाहन केले.शाळेच्या वाटचाली बद्दल सांगताना ते म्हणाले सन -2009 मध्ये स्थापन केलेल्या सिध्दार्थ पब्लिक स्कूल या शाळेस सी.बी.एस.ई दिल्ली बोर्ड यांनी सन-2016 मध्ये मान्यता दिली आहे.त्याचबरोबर सन-2020 मध्ये सी.बी.एस.ई दिल्ली बोर्डाने शाळेस परीक्षा केंद्र म्हणून मंजूरी दिल्याबद्दल आनंद व्यक्त केला.विद्यार्थ्याना परीक्षेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

स्कूलचे प्राचार्य डॉ.विल्सन थॉमस म्हणाले,सर्व विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करून कठोर शाळेचा निकाल 100 टक्के निकाल लावत,शाळेचा लौकिक वाढवावा.येथून पुढे घडणारा विद्यार्थी शाळेच्या नाव उज्वल करेल,असा परिपुर्ण विद्यार्थी आम्ही घडवला आहे.

 

 

जत येथील सिध्दार्थ पब्लिक स्कूलच्या दहावीच्या विद्यार्थ्याच्या निरोप समारंभ प्रंसगी उपस्थित मान्यवर व विद्यार्थी
 

 



 



 

Blogger द्वारे प्रायोजित.