Header Ads

राजे रामराव महाविद्यालयात पर्यावरण संरक्षणाचा जागर 

 


जत,प्रतिनिधी : येथील राजे रामराव महाविद्यालयाच्या इतिहास विभागाच्या वतीने अग्रणी महाविद्यालय योजना व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने "पर्यावरण संरक्षण : काळाची गरज" या विषयावर एकदिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत प्रथम सत्राचे वक्ते म्हणून पद्मभूषण डॉ वसंतदादा पाटील महाविद्यालयात, तासगाव येथील इतिहासाचे प्राध्यापक जी.के.पाटील तर द्वितीय सत्राचे वक्ते महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक डॉ. राजेंद्र लवटे उपस्थित होते.कार्यशाळेचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही.एस.ढेकळे उपस्थित होते.कार्यशाळेचे प्रास्ताविक इतिहास विभागप्रमुख प्रा.पी.जे.चौधरी यांनी केले. सूत्रसंचलन कु.स्वाती जाधव हिने तर आभार प्रा.एच.डी.टोंगारे यांनी मानले. 

 

जत कार्यशाळेत बोलताना प्राचार्य डॉ व्ही एस ढेकळे

Blogger द्वारे प्रायोजित.