Header Ads

सिद्धेश्वर कोरे राज्यस्तरीय आदर्श शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित


 

 

 

सोन्याळ,वार्ताहर : शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा लकडेवाडीचे पात्रपदवीधर शिक्षक व मुख्याध्यापक सिद्धेश्वर यल्लप्पा कोरे  यांना विलासरावजी देशमुख राज्यस्तरीय आदर्श शिक्षकरत्न पुरस्काराने लातूर  येथील गिरवलकर सभागृहात देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील-चाकुरकर, आमदार धीरज देशमुख,जेष्ठ साहित्यिक इंद्रजित भालेराव,महाराष्ट्र प्रदेश शिक्षक काँग्रेस महिला अध्यक्षा सौ.सुजाता माळी (चौखंडे), लातूरचे महापौर आणि उपममहापौर यांच्या प्रमुख उपस्थितीत  मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.               

सिद्धेश्वर कोरे हे गेल्या पंचवीस वर्षापासून शिक्षकी पेशामध्ये कार्यरत राहून प्रामाणिकपणे सेवा बजावीत आहे. एक उपक्रमशील शिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे.त्यांनी यापूर्वी आसंगी (जत) तील्याळ, शेडयाळ, या शाळेत  सेवा केली आहे.  ते क्रीडा शिक्षक म्हणूनही उत्तमरीत्या काम करीत असतात. चालू वर्षात शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी आणि गुणवत्तापूर्ण कामामुळे सांगली जिल्हा परिषदकडून जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.सहारा ग्रुप आणि लायन्स क्लबकडूनसह यापूर्वी कोरे यांना अनेक आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाले आहेत.शिक्षकांच्या कल्पकता आणि इच्छाशक्तीतून लकडेवाडीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा कायापालट झाला आहे. लकडेवाडी येथे पहिली ते आठवीपर्यंत वर्ग आहेत. या शाळेचे नेहमीचे स्वरूप आमूलाग्र बदलले असून शाळा गुणवत्ता व विद्यार्थी संख्येने बहरत चालली आहे. हे सर्व बदल करण्यामध्ये मुख्याध्यापक सिद्धेश्वर कोरे  व शिक्षकांचा  मोलाचा वाटा आहे. शाळेत काय सुधारणा करण्याची आवश्यकता आहे यासाठी मुख्याध्यापक  आणि शिक्षक यांनी पालकांच्या व ग्रामस्थांच्या मदतीने योग्य नियोजन करत आहे. त्यामुळे शाळेचा कायापालट झाला असून त्याचे चांगले फळ आज पाहावयास मिळत आहे.लकडेवाडी शाळा परिसरात आदर्श म्हणून ओळखली जात असून नवनवे उपक्रम मोठय़ा उत्साहाने येथे राबविले जातात.बालवयातच मुलांवर संस्कार करण्याचे कार्य ही शाळा प्रभावीपणे करीत आहे.परिसरातील ग्रामस्थ,पालक यांच्या सहकार्याची जोड घेऊन मागील काही वर्षापासून गुणवत्ता विकासासाठी अनेक उपक्रम हाती घेण्यात आले.यातून शाळेच्या गुणवत्तेचा व पटसंख्येचा आलेख हळूहळू वाढलेला असून आज शाळा गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडविणारी शाळा म्हणून नावारूपाला येत आहे. या शाळेत इ लर्निंग, डिजिटल लर्निंग,पाढे, सुंदर हस्ताक्षर, चित्रकला, इंग्रजी वाचन, स्पेलिंग पाठांतर, अंकखेळ,वाढदिवस व इतर उपक्रम घेऊन गुणवत्ता पूर्ण शिक्षण दिले जाते.कार्यक्रमास  जत तालुका  शिक्षक समितीचे सरचिटणीस चनबसु चौगुले उर्फ गूब्बा सर,  सांगली जिल्हा काष्ट्राईब  शिक्षक संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष लखन होनमोरे,तंत्रस्नेही व कला शिक्षक रमेश धायगोंडे,निलंगा हायस्कूलचे उपमुख्याध्यापक चनप्पा लगळी सर,महाराष्ट्र राज्यातून आलेले विविध संघटनेचे  शिक्षक पदाधिकारी आणि पुरस्कार प्राप्त शिक्षक उपस्थित होते.

 

जेष्ठ साहित्यीक आणि कवी इंद्रजित भालेराव यांच्याहस्ते सिद्धेश्वर कोरे यांचा आदर्श शिक्षकरत्न देऊन सत्कार करण्यात आला.
 

 


Blogger द्वारे प्रायोजित.