Header Ads

उमराणीतून जाणाऱ्या ककमरी ते सिंदुर रस्त्याची दुरावस्था

 


उमराणी,वार्ताहर : ककमरी ते सिंदुर रस्ता हा उमराणी येथील वार्ड नं 1 मधुन किमान दिड किलो मिटर जाणारा रस्ता खड्डेमय झालेला आहे.रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात सांडपाणी साचून राहत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे.साटलेल्या साडपाण्यामुळे डासांची संख्या वाढली आहे.त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.थेट रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडल्याने लोकांना चालत जाता ही येत नाही.वयोवृध्द लोकांचे हाल तर होत आहेच.या मार्गावरून अवजड वाहनाची मोठ्या प्रमाणात जा-ये असल्याने धुळीने रस्त्या लगतच्या घरात मातीचे थर साचत आहे. यार्डमधील ग्रामस्थांना जेवणात पाण्यात घरात मातीचे थर रचत आहे.त्यामुळे गटारी काढून रस्त्याचे डांबरीकरण करावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे.


 

 

उमराणी ता.जत गावातून जाणाऱ्या ककमरी ते सिंदुर रस्त्याची झालेली दुरावस्था(छायाचित्र, राजेंद्र खांडेकर)

दोन्ही फोटो वापरा

Blogger द्वारे प्रायोजित.