जिव्हाळा पतसंस्थेचे चेअरमन जगताप,व्हा.चेअरमन रूपनूर यांचा सत्कार
जत,प्रतिनिधी : जिव्हाळा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित जतच्या चेअरमनपदी समाधान जगताप व व्हाईस चेअरमनपदी विजय रूपनूर यांची तर मराठा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित जतचे व्हाईस चेअरमनपदी श्रीकृष्ण पाटील यांची निवड झाल्याबद्दल सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जमदाडे, पंचायत समितीच्या माजी सभापती सौ.मंगल प्रकाश जमदाडे व परिवारांचे वतीने आज शाल, श्रीफळ व बुफे देवून सत्कार करण्यात आला. या प्रसंगी माजी व्हा.चेअरमन महेश मालकत्ते,मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष किरण जाधव,परिषदेचे तालुकाध्यक्ष दिनराज वाघमारे,बादल सर्जे,सोमनिंग कोळी,जयवंत आदाटे,प्रमोद जमदाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
जत येथील जिव्हाळा पतसंस्थेचे चेअरमन, व्हा.चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला.