Header Ads

ग्रामपंचायतीच्या बंदीच्या ठरावनंतरही अंकलेत दारू विक्री सुरू | कारवाईची मागणी

ग्रामपंचायतीच्या बंदीच्या ठरावनंतरही अंकलेत दारू विक्री सुरू ; कारवाईची मागणी
जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील मोठे गाव असणाऱ्या अंकलेत गेल्या अनेक वर्षापासून बेकायदा दारू विक्रेत्यांनी उच्चाद मांडला आहे.हायस्कूल,जिल्हा परिषद शाळा,सिध्दनाथ मंदिर अशा सार्वजनिक परिसरात अवैध दारू विक्रीचे अड्डे बळावले आहेत.यामुळे गावची शांतता भंग होतअसल्याने वारवांर दारू बंदीची मागणी महिला व ग्रामस्थातून होत आहे. त्यामुळे 26 जानेवारीला झालेल्या ग्रामसभेत सर्वानुमते संपूर्ण गावात दारू बंदीचा ठराव घेण्यात आला आहे. जत पोलीस व उत्पादन शुल्क विभागाला ग्रामपंचायतीच्या वतीने रितसर ठरावाची प्रत व निवेदन दिले आहे.तरीही अद्याप दारू विक्री सुरू आहे.यामुळे तरूण वर्गासह,शाळेकरी मुले या दारूच्या गुत्यांवर गुटमळत आहेत.दारूमुळे अनेक कुंटुबे उद्धवस्त झाली आहेत.हे बेकायदा दारू थेट सार्वजनिक ठिकाणे,मंदिर परिसर,शाळाच्या लगत सुरू आहेत.त्यामुळे त्याचा समाजमनावर विपरित परिणाम होत आहे.त्यामुळे पोलीस व उत्पादन शुल्क विभागाने तातडीने कारवाई करून संपूर्ण दारू बंदी करावी असे ठरावात म्हटले आहे.


Blogger द्वारे प्रायोजित.