Header Ads

जिव्हाळा पतसंस्थेच्या अध्यक्षपदी समाधान जगताप

 

जत,प्रतिनिधी : जत शहरात अल्पावधीतच लोकप्रिय झालेली जिव्हाळा नागरी व्यापारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी जिव्हाळा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष डॉ. समाधान जगताप यांची सर्वानुमते फेरनिवड करण्यात आली.जिव्हाळा पतसंस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीची बैठक झाली.या बैठकीत डॉ. समाधान जगताप यांची सर्वानुमते अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली, तर उपाध्यपदी विजय रुपनूर यांची बिनविरोध निवड झाली.यावेळी विधी सल्लागारपदी ॲड.सागर व्हनमाने, स्वीकृत संचालकपदी दीपक अंकलगी,बाळासाहेब काशीद यांच्या निवडी करण्यात आल्या. यावेळी संचालक महादेव जाधव, प्रमोद जमदाडे, सचिन माने, सुनील साळे, विजय शिंदे, आनंद गायकवाड, अनिता जगताप, शांताबाई भोसले आदी उपस्थित होते.निवडणक निर्णय अधिकारी म्हणून एम. एच.कोळी यांनी काम पाहिले.

 

 


  

Blogger द्वारे प्रायोजित.