Header Ads

उमदीत आठ लाखाचे दोन मांडूळ जप्त | कर्नाटकातील एकजण ताब्यात


  

 

 

उमदीत आठ लाखाचे दोन मांडूळ जप्त

 

कर्नाटकातील एकजण ताब्यात : आंतरराष्ट्रीय तस्करीचा संशय

 

 

उमदी,वार्ताहर : दुर्मिळ समजले जाणाऱ्या मांडूळ सर्पाची तस्करी करणाऱ्या एकाला दोन मांडूळासह उमदी पोलीसाच्या पथकाने ताब्यात घेतले. सचिन गणपती भोसले(वय 19,रा.जालिगिरी ता. विजयपूर जि. विजयपूर,कर्नाटक)पकडलेल्या तस्कराचे नाव आहे.मांडूळाची सध्या बाजार भावाप्रमाणे 8 लाख रूपये किंमत आहे. याबाबत उमदी पोलीसानी गुन्हा दाखल केला आहे.

पोलीसांनी दिलेली माहिती अशी,सचिन भोसले हा उमदी पोलीस ठाणे हद्दीत मांडूळ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती खबऱ्याकडून पोलीसांना मिळाली होती.त्याआधारे पोलीसांनी सापळा रचून तिकोंडी ते तिकोटा कर्नाटक कडे जाणाऱ्या रोडवर त्याला दोन मांडूळ सर्पासह ताब्यात घेतले.मांडूळ जप्त करण्याची ही सांगली जिल्ह्यातील दुसरी घटना आहे. परवा विटा पोलिसांनी एका इसमास दहा लाखाचे मांडूळ जप्त केले होते. मांडूळ पैशांचा पाऊस पडतो, अशी धारणा असल्याने मोठ्या प्रमाणात मांडूळांचीही विक्री होत आहे.

पोलीस हवलदार बसवराज कोष्टी,विक्रम गोधे,इंद्रजीत गोधे यांनी कारवाई केली.डिवासएसपी दिलीप जगदाळे यांच्या उपस्थितीत दोन्ही मांडूळ सर्प वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.दरम्यान कर्नाटकातील पकडलेल्या तस्कारामुळे दुर्मिळ वन्यप्राण्याची आंतरराष्ट्रीय तस्करी होत असल्याचे समोर आले आहे.पोलीसांनी या तस्कारांच्या टोळीच्या मुळाशी जाऊन तपास करावेत,अशी मागणी प्राणीमित्राकडून होत आहे. 

 

 

उमदी ता.जत येथे जप्त केलेल्या दोन मांडूळासह संशयित युवक व पोलीस पथक

 


 

Blogger द्वारे प्रायोजित.