Header Ads

डफळापूर पाणी योजनेसाठी 80 लाखाचा निधी मिळाला


 
डफळापूर पाणी योजनेसाठी 80 लाखाचा निधी मिळाला

 

डफळापूर, वार्ताहर : डफळापूर पेयजल पाणी योजनेसाठी अखेर 80 लाखाचा 
तिसऱ्या हप्त्याची रक्कम ग्रामपंचायतीच्या खात्यावर जमा झाली आहे.आम्ही दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यांची अखेर प्रशासनाने दखल घेतल्याची माहिती कॉ.हणमंत कोळी यांनी दिली.


कोळी म्हणाले,डफळापूरात येत्या काही दिवसात मोठी पाणी टंचाई निर्माण होणार आहे.गेल्या अनेक वर्षापासून बंद असलेल्या पेयजल पाणी योजनेचे रखडलेले काम पुर्ण करावे अशी आमची मागणी आहे.मी व विक्रम ढोणे यांनी ते काम व्हावे म्हणून आंदोलनाचा इशारा दिला होता.त्या अनुषंगाने योजनेचा तिसऱ्या हप्त्याचे जवळपास 80 लाख रूपयाचा निधी ग्रामपंचायतीच्या खात्यावर जमा झाला आहे. त्यातून वाड्यावस्त्याची कामे होणार आहेत.मुळ शुध्दीकरण यंत्रणा,टाक्यासह अन्य कामासाठी निधी लवकरच मिळणार असल्याचे आम्हाला प्रशासनाने सांगितले आहे.आलेल्या निधीतून दर्जदार कामे व्हावीत यासाठी आमचे लक्ष असणार आहे.कामात हयगय झाल्यास आंदोलन करू असा इशाराही कोळी यांनी दिला आहे.  

 


 

Blogger द्वारे प्रायोजित.