Header Ads

पुढाऱ्यांचे कमिशन,गावातील कामाचा दर्जा घसरला

पुढाऱ्यांचे कमिशन,गावातील कामाचा दर्जा घसरलाजत,प्रतिनिधी : जत तालूक्यातील अनेक गावांमध्ये होणार्‍या सार्वजनिक विकास कामातं मोठ्या भानगडी होत असून गाव पुढाऱ्याच्या कमिशनमुळे कामाचा दर्जा पुरता घसरला आहे. केलेली कामे महिन्याभरात उखडले जात आहेत.तर काही बोगस कामे घुसटण्याचे प्रकार वाढले आहेत.येऊ घातलेल्या मार्चएंडच्या पाश्वभुमीवर अनेक गावात मोठ्या प्रमाणात विकास कामे गतीने सुरू आहेत. पंरतू घाई गडबडीत टक्केवारीने ही कामे दर्जाहीन होत आहेत.  कामांची गुणवत्ता आणि दर्जा यासाठी अनेक ठेकेदार आणि काही अधिकारी यांची साखळी जोमात असल्याचा चर्चा होत आहे.गावाचा विकास व्हावा म्हणून अशा कामासाठी पुरेसा निधी असून देखील कामाचा दर्जा चांगला का राखला जात नाही, याकडे अधिकारी का लक्ष देत नाहीत, असे सवाल ग्रामस्थ करत आहेत. तर याकडे बहुसंख्य स्थानिक नेतेमंडळींनी डोळेझाक  केल्याचे चित्र आहे. तसा ग्रामस्थांतून आरोप देखील होत आहे.  याबाबत  संबंधित अधिकार्‍यांनी कडक कारवाई करावी, दर्जाहीन कामाना वरिष्ठ अधिकाऱ्यापासून मोठी यंत्रना कार्यरत आहे. गावसेवेचा आव आणणाऱ्या लोकप्रतिनिधीनीचे अर्थपुर्ण दुर्लक्ष होत असल्याचा ग्रामस्थाचा आरोप आहे. जिल्हा पातळीवर अधिकाऱ्यानी पाहणी करून कारवाई करावी अशी मागणी आहे.
Blogger द्वारे प्रायोजित.