Header Ads

धूळ अन् थंडीमुळे दमा रुग्णांचा वाढला त्रास!

जत,प्रतिनिधी : कधी थंडी, तर कधी ढगाळ वातावरणामुळे हवामानात झपाट्याने बदल होत आहे. अशा वातावरणाचा आरोग्याला  फटका बसत असून, सर्दी, खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. अशातच मुख्य रस्त्यांच्या निर्माण कार्यामुळे शहरात सर्वत्र धूळ पसरली असून, दमा रुग्णांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे दमाच्या रुग्णांनी वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचा सल्ला तज्ज्ञ डॉक्टर देत आहेत.वाहनांच्या धुरासोबतच रस्त्यावरील धुळीच्या कणांमुळे प्रदूषणात वाढ झाली आहे. या प्रदूषणाचा अकोलेकरांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून, सर्वाधिक धोका दमा आजारांच्या रुग्णांना होत आहे. हवेतील धुळीच्या कणांमुळे दमा रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होत असून, त्यांच्यासाठी हा प्रकार जीवघेणा ठरत आहे. अशातच सर्वोपचार रुग्णालयात औषधांचा तुटवडा असल्याने गरीब रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यावा लागत आहे. अशा परिस्थितीत अकोलेकरांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांकडून देण्यात येत आहे.हे करा...  • बाहेर निघताना मास्कचा वापर करावा.

  • धुळीच्या मार्गाऐवजी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा.

  • उघड्यावरील तळलेले खाद्यपदार्थांचे सेवन टाळा.

  • श्वास घेण्यास त्रास झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Blogger द्वारे प्रायोजित.