Header Ads

डॉ बापूजी साळुंखे खरे शिक्षणतज्ज्ञ :  महसूल मंत्री बाळासाहेब थोरात | राजे रामराव महाविद्यालयाचा सुवर्णमहोत्सव सांगता, सुवर्ण स्मृति स्मरणिका व दिनदर्शिकेचे प्रकाशन

 

 

 

जत,प्रतिनिधी : डॉ. बापूजी साळुंखे यांनी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था स्थापन करून अनेक विद्यार्थी व शिक्षकांचे जीवन सुखी आणि समृद्ध बनवले आहे. बापूजींनी ज्ञानाची गंगोत्री गोरगरिबांच्या मुलांपर्यंत पोहोचवली. जतसारख्या दुष्काळी आणि शैक्षणिकदृष्ट्या मागे राहिलेल्या दुर्गम भागातील गोर-गरीबांच्या मुलांसाठी शिक्षणाची सोय व्हावी या उदात्त हेतूने जत संस्थानाचे अधिपती श्रीमंत विजयसिंह राजे डफळे यांच्या उदार दातृत्वातून जून 1969 साली त्यांनी या महाविद्यालयाची स्थापना केली. आज या घटनेला 50 वर्षे पूर्ण झाली असून आपन डॉ बापूजी व श्रीमंत विजयसिंह राजे डफळे यांच्या कार्याचा जागर करणे गरजेचे असल्याचे मत राज्याचे महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. ते आज जत येथे राजे रामराव महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सव सांगता समारंभ व सुवर्णमहोत्सव स्मृति स्मरणिकेचे प्रकाशन या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

यावेळी महाविद्यालयाचा सुवर्णमहोत्सव सांगता समारंभ, सुवर्ण स्मृति स्मरणिका प्रकाशन, दिनदर्शिका प्रकाशन, नूतन इमारत कोनशीला भूमिपूजन व माजी विद्यार्थी स्नेह मेळावा अशा संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राज्याचे कृषी व सहकार राज्यमंत्री नामदार डॉ विश्वजीत कदम हेसुद्धा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या शुभहस्ते नूतन इमारत कोनशीला भूमिपूजन संप्पन्न झाले.आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की, श्रीमंत विजयसिंह राजे डफळे हे जतचे खरे भाग्यविधाते आहेत. त्यांनी शिक्षण, आरोग्य, क्रिडा, राजकारण व समाजकारणात बहुमोल योगदान दिले असून राजे रामराव महाविद्यालयाच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यावेळी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. ते म्हणाले की, शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी बुद्धीला सत्याकडे, भावनेला माणुसकीकडे, शरिराला श्रमाकडे घेऊन जाणारे शिक्षण देता यावे, हे उद्दिष्ट मनाशी बाळगून ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षणप्रसार हे ध्येय मनाशी बाळगून बहुजन समाजांतील मुलांसाठी महाराष्ट्रांतील विविध संस्कार केंद्रांतून शिक्षणप्रसाराचे बहुमुल्य कार्य सुरू केले आहे. त्यातील एक संस्कारकेद्र जतच्या माळरानावर स्थापन करून खेडोपाड्यातील मुलांना शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली आहे.

या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ व्ही एस ढेकळे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ श्रीकांत कोकरे यांनी तर आभार प्रा चंद्रसेन मानेपाटील यांनी व्यक्त केले. यावेळी आमदार विक्रमसिंह सावंत हे माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून श्रीमंत इंद्रजित उर्फ बाबाराजे डफळे, श्रीमंत शार्दुलराजे डफळे, आमदार मोहनराव कदम, प्राचार्य पी, एस चव्हाण, प्राचार्य श्री. शिवाजीराव बिसले, प्राचार्य डाॅ. श्रीपाद जोशी, जत येथील प्रसिध्द धन्वंतरी डाॅ. मनोहर मोदी, आप्पासाहेब बिराजदार, नाना शिंदे, अँड. प्रभाकर जाधव, शशिकांत काळगी, चंद्रशेखर गोब्बी, मुंबई येथील पोलीस अधिकारी श्री. सदाशिव  व्हनकट्टे, शशिकांत गडदे, सौ.मीनाक्षी अक्की, अलका माने, प्रा. चंद्रसेन माने पाटील, अनिल मिसाळ, अमर जाधव, मल्लीनाथ सिंदगी व माजी विद्यार्थी आदी मान्यवर  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

जत येथील राजे रामराव महाविद्यालयाच्या सुवर्ण स्मृति स्मरणिका व दिनदर्शिकेचे प्रकाशन करताना ना.बाळासाहेब थोरात,विश्वजीत कदम,आ.मोहनशेठ कदम,विक्रमसिंह सांवत

Blogger द्वारे प्रायोजित.