Header Ads

| सांगली | जिल्ह्यात रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीया मजबुत करा : ना.रामदास आठवले | सांगली आरपीआयच्या वतीने सत्कार 


 
 

 

 

जिल्ह्यात रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीया  मजबुत करा : ना.रामदास आठवले

 

सांगली आरपीआयच्या वतीने सत्कार

 

जत,प्रतिनिधी : केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांना डॉक्टरेट मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.महाराष्ट्र दौऱ्यावर असताना ते मिरज येथे आले होते.मंत्री आठवले यांचा सत्कार प्रदेश सचिव विवेक कांबळे, जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांच्याहस्ते पुष्पहार,शाल घालून करण्यात आला. मंत्री आठवले हे एकदिवसीय सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी कार्यकर्त्यांना आगामी येणाऱ्या जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तयारीला लागले पाहीजे,आरपीआयचा प्रतिनिधी पाठवायचा असेल तर रिपब्लीकन कार्यकर्त्यांनी आतापासून कामाला लागावे.कार्यकर्त्यांनी प्रत्येक गावामध्ये घरोघरी भेटी देऊन जनतेच्या अडीअडचणी समजावून घेऊन त्या सोडविल्या पाहीजेत,मत व्यक्त केले.

नामदार आठवले पुढे म्हणाले की,ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदच्या कार्यक्षेत्रात शेवटच्या घटकापर्यंत सरकारच्या योजना पोहोचल्या पाहीजेत.आर.पी.आय.च्या कार्यकर्त्यांनी सचोटीने काम करावे.डॉ. आंबेडकरांच्या संकल्पनेतला सर्व

समावेशक रिपब्लीकन पक्ष सांगली जिल्ह्यामध्ये मजबूत केला पाहीजे. केंद्रातील समाज कल्याण विभागाकडील योजना आहेत,त्या योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला पाहीजे.योजनेचा लाभ कार्यकर्त्याला मिळाला पाहीजे,अशाही सुचना दिल्या.यावेळी सांगली जिल्हा ग्रामीण अध्यक्ष बाबा कांबळे, युवा आघाडी सांगली जिल्हाध्यक्ष अशोक कांबळे, महिला जिल्हाध्यक्ष छाया सरवदे, लोकसभा क्षेत्र अध्यक्ष संदेश भंडारे, सांगली शहर अध्यक्ष बापुसाहेब सोनवणे,आटपाडी तालुका अध्यक्ष राजेंद्र खरात, तासगांव तालुका अध्यक्ष प्रविण धेंडे,मिरज तालुका अध्यक्ष अरविंद कांबळे,कंवठेमहांकाळ तालुका अध्यक्ष पिंटु माने,नगरसेवक लालासाहेब वाघमारे, जत तालुका अध्यक्ष संजय कांबळे पाटील, अरुण आठवले आदि, व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

 

सांगली येथे केंद्रिय मंत्री रामदास आठवले यांचा सत्कार करताना विवेक कांबळे,जिल्हाध्यक्ष संजय कांबळे

 
 


Blogger द्वारे प्रायोजित.