| मुंबई | तुबची-बबलेश्वरसाठी लवकरचं बैठक | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आ.सांवत यांना आश्वासन, म्हैसाळ योजनेलाही निधी मिळणार

 
तुबची-बबलेश्वरसाठी लवकरचं बैठक

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आ.सांवत यांना आश्वासन, म्हैसाळ योजनेलाही निधी मिळणा

 

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील तुबची-बबलेश्वरसह म्हैसाळ सिंचन योजनाची रखडलेली कामे तातडीने सुरू करावी, अशी मागणी आमदार विक्रमसिंह सांवत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. यासंदर्भात मुख्यमंत्री ठाकरे यांची आ.सावंत यांनी भेट घेतली.

तालुक्यातील कायम आवर्षणग्रस्त असणाऱ्या पुर्व भागातील तुबची-बबलेश्वर योजनेसाठी कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातील अधिकाऱ्यांची बैठक घेवू असे आश्वासन मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिल्याचे आ.सांवत यांनी सांगितले.

जत तालुक्यातील म्हैसाळ सिंचन योजना, तुबची -बबलेश्वर सिंचन योजना, 75 गावाची नळपाणी पुरवठा योजना पुर्ण करावी अशी मागणी यावेळी आ.सांवत यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली.

2012 च्या तीव्र दुष्काळात जत पुर्व भागातील 47 गावांनी कर्नाटकात जाण्याचा इशारा दिला होता. त्यावेळी आपण जत दौऱ्यावर आला होता. शिवसेनेचे सरकार आल्यावर या भागाचा दुष्काळ संपवू असे आश्वासन त्यावेळी  दिले होते. आता ते पुर्ण करण्याची वेळ आल्याची आठवण मुख्यमंत्री ठाकरे यांना करून दिली.कर्नाटकातील योजनेतून पुर्व भागातील 5 तलावात नैसर्गिक उताराने पाणी येत आहे.गतवेळी पाच तलावही कर्नाटकातून सोडलेल्या पाण्याने भरले होते.सध्या महाराष्ट्रातून कर्नाटकाला दरवर्षी दोन टिएमसी पाणी सोडत आहोत.तेच पाणी पुर्व भागातील गावांना या योजनेतून अगदी अत्यल्प खर्चात देणे शक्य असल्याचे यावेळी आ.सांवत यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना सांगितले.जतच्या सिंचन योजनेसाठी लवकरच कर्नाटक व महाराष्ट्रातील जलसंपदा अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जतला पाणी कसे देता येईल याबाबत लवकरचं तोडगा काढू असे आश्वासन मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले असल्याचेही आ.सावंत यांनी सांगितले.

आ.सांवत यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,जत तालुक्यातील 43 गावे म्हैसाळ व इतर सर्व पाणी पुरवठा योजनेपासुन वंचीत आहेत. सदर जत तालुका हा 100 टक्के अवर्षण प्रवण असुन कायमस्वरूपी दुष्काळग्रस्त मानला जातो. तरी तुबची बबलेश्वर उपसा सिंचन योजना हि कर्नाटक राज्याची योजना असुन महाराष्ट्र राज्याच्या सिमेलगत आली असुन कर्नाटकातील काही भागांना कृष्णा नदी नरसोबावाडी ते जमखंडी कृष्णा नदीच्या पात्रात 2 टीएमसी पाणी कर्नाटक राज्याला 15-16,16-17,17-18 या तीन वर्षात 2 टीएमसी असे एकूण 6 टीएमसी पाणी कर्नाटक सरकारला दरवर्षी उन्हाळ्यात महाराष्ट्र सरकार देते.बदल्यात आपण पावसाळयातील अतिरीक्त पाणी सुमारे 2 टीएमसी ग्रॅव्हीटी पध्दतीने कमी खर्चात सदर जत तालुक्यातील पूर्व भागातील वंचीत गावांना मिळू शकते. त्यासाठी आंतर राज्य पातळीवर अधिकारी स्तरावर तांत्रिक बैठका लावून सदर योजना सहज शक्य असल्याचे सिध्द झाले आहे. या पाण्याने भिवर्गी, संख, सिध्दनाथ, मोटेवाडी,1 नं. तिकोंडी, 2 नं तिकोंडी या तलावात तुबची-बबलेश्वर या योजनेतून अंशत: पाणी आल्याने सिध्द झाले आहे.याकरीता कायमस्वरूपी करार होणे गरजेचे आहे.

 

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत आ.विक्रमसिंह सांवत यांनी तुबची-बबलेश्वर योजनेसाठी बैठक घेण्याबाबत निवेदन दिले.

 

फोटोत बाजूचे कट करून टाका