Header Ads

जतेत शासकीय कार्यालयांचे वृक्ष गायब | शासनाच्या धोरणाला हरताल : वृक्ष लागवड तपासण्याची गरज






 


जत,प्रतिनिधी : वन विभागाच्या 33 कोटी वृक्ष लागवड योजनेअतर्गंत जत तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये,शाळा,नगरपरिषद,विद्यालये,संस्थांना वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते.त्यासाठीचे वृक्ष वन विभागाच्या वतीने पुरवण्यात आले होते.मात्र तालुक्यातील अनेक शासकीय कार्यालयाकडून या वृक्ष लागवडीत निष्काळीपणा केला आहे. फोटो पुरते वृक्ष लावत शासनालाही गंडविले आहे.त्यामुळे जत तालुक्यात उद्दिष्ठ दिलेल्या शासकीय कार्यालयाकडून लावलेल्या वृक्षाची तपासणी करावी,अशी मागणी युवा नेते विक्रम ढोणे यांनी केली आहे. 

दुष्काळी जत तालुक्यात पर्यावरण समोतल रहावा यासाठी शासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली होती.त्यात शासकीय कार्यालये,संस्था,शाळांना समाविष्ट करत वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट दिले होते.मात्र काही अपवाद वगळता अनेक शासकीय कार्यालयाची वृक्ष लागवडी बाबतची उदाशीनता समोर आली आहे. जत आगारातील तब्बल दोन हजार रोपे वाया घालविण्यात आली.अधिकाऱ्यांच्या उदाशीन धोरणामुळे ते वृक्ष न लावल्याने तसे पडून वाळून गेले आहेत.हा प्रकार ढोणे यांनी समोर आणल्यानंतर शासकीय कार्यालयाकडून वृक्ष लागवडीचे सोपस्कर कसे पुर्ण केले आहे,याची पोलखोल करण्यात आली आहे.युती शासनाच्या 33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम योजने अंतर्गत वन विभागाने तालुक्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीचे धोरण अवलंबत कारवाई केली होती.मात्र वनविभाग व अन्य काही कार्यालयांनीच ते मानावर घेऊन केल्याचे समोर आले आहे.तर जत आगारासह अन्य काही शासकीय कार्यालयाकडून गांभिर्यांने न घेतल्याने हाजारो रोपे जळून गेली आहेत.काही अधिकाऱ्यांच्या निष्काळजी पणामुळे शासनाच्या वृक्षलागवड धोरणालाच हरताळ फासण्याचे प्रकार तालुक्यात केले गेल्याचे स्पष्ट झाले आहे.

दुष्काळी परिस्थितीत बदल होण्यासाठी व निसर्गाचा समतोल साधण्यासाठी राज्य सरकारने वृक्ष लागवडीचा धोरणात्मक निर्णय घेतला.सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये यांच्यामार्फत वृक्ष लागवड कार्यक्रम राबविण्यात आला.पण प्रत्यक्षात त्याला हरताल फासला आहे.पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी यांची चौकशी करावी,अशी मागणी करणार असल्याचे ढोणे यांनी सांगितले.

 

 

जत आगारात वाळून गेलेली रोपे


 

 




 

 


 



 



Blogger द्वारे प्रायोजित.