Header Ads

माडग्याळच्या भोंड्या माळावर उभे राहिलेले स्कूल आज पन्नाशीत


 

 

 

माडग्याळ सारख्या ग्रामीण भागातील मुलांना शैक्षणिक सेवा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने 1966 साली दि फ्रेंडस् असोसिएशन जत या संस्थेची स्थापना काही ध्येयवेड्या तरूणांनी केली.या संस्थेत दीन दलितांचे शिक्षण,मागास भागाचा विकास,स्वातंत्र्य,समता बंधलता व समोर ठेऊन तालुक्यात शैक्षणिक क्रांती आणण्याचे प्रयत्न सुरू केले त्यातून जत,माडग्याळ, मुंचडी,कुंभारी येथे शैक्षणिक संकुले उभारण्यात आली.त्यातील न्यू इंग्लिश स्कूल अँन्ड ज्यूनि कॉलेज ऑफ आर्टस् अँन्ड सायन्स माडग्याळ या शाखेने आज 50 वर्षाचा टप्पा पुर्ण केला आहे. त्यानिमित्त आज सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. माडग्याळच्या भोड्या माळरानावर ता.12 जून 1968 साली हे स्कूल चालू करण्यात आले. त्याला आज पन्नास वर्षे पुर्ण झाली आहेत.खाजगी जागेतून सुरू झालेल्या हे स्कूल आज प्रशस्त व सुसज्ज इमारतीसह भव्य शैक्षणिक संकूल पर्यत पोहचले आहे.माडग्याळ मधील दानसुर व्यक्तिंनी खऱ्या अर्थाने या शाळेची उभारणीत मोठी मदत केली आहे.माडग्याळ परिसरातील शैक्षणिक सुविधा उभारण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ.एस.के कलकडकर यांनी मोठे योगदान दिले.त्यांच्या संकल्पनेतून उभा राहिलेली ही संस्था आता वटवृक्षात रुंपातरीत झाली आहे.

शाळा सुरू केल्यानंतर प्रथम शाळे करीता

श्री.एकनाथ पाटील यांनी इमारत भाड्याने दिली. परगावाहून आलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांची जेवणाची सोय केली.त्यामुळे या शाळेत दुर असणारे को. बोबलाद,अक्कळवाडी,बेळोडगी, बोर्गी, मंगळवेढा तालुक्यातील खुपसंगी येथील मुले शिक्षणासाठी प्रवेश घेवू लागले.विद्यार्थ्यांची संख्या व तुकड्या वाढल्याने श्री.एकनाथ पाटील यांची जागा अपूरी होवू लागली. त्यामुळे माडग्याळ गावचे माजी सरपंच बी.एल कोरे यांचा वाडा घेण्यात आला.सन 1977 मध्ये इयत्ता 5 वी चे वर्ग आमच्या माध्यमिक शाळेस जोडल्यामुळे कै. रायगोंडा कोरे यांनी पुन्हा दोन चाडे बांधून वर्ग तुकड्यांची सोय करून दिली. शाळा उत्तरोत्तर वाढत असताना संस्थेला शाळेसाठी स्वत:ची मालकीची

जागा हवी असे वाटू लागले.त्यावेळी येथील प्रतिष्ठित

नागरीक कै.सदाशिव बाजीराव पाटील व श्री. गंगाराम ज्ञानू मळीक यांच्याशी विचार विनिमय करून त्यांच्याकडून अत्यल्प किंमतीत सहा एकर जागा जत चडचण या रस्त्यावर खरेदी केली. काही तांत्रिक अडचणींमुळे संस्थेला वर इमारत बांधता आली नाही. त्या जागेचे उपयोग क्रिंडागण म्हणून केला जाऊ लागला. तांत्रिक अडचण दूर नंतर संस्थेने दि.6 डिसेंबर 1990 रोजी शाळेच्या पाभरणीचा समारंभ डॉ.कलकडकर यांच्या अध्यक्षतेखाली व जी. एस. हिरेमठ महाराज यांच्या उपस्थितीत,डॉ. कलकडकर यांच्या शुभहस्ते कार्यक्रम संपन्न झाला.23 मार्च 1992 पासून इमारतीच्या बांधकामास प्रत्यक्ष सुरूवात झाली.आज अखेर अनेक दानशूर व्यक्तींच्या मदतीने संस्थेने दोन प्रशस्त 20 खोल्यांची इमारत उभी केली आहे. या इमारतीत आप्पासाहेब कोंडिबा माळी (मुळ रा.माडग्याळ) केळी व्यापारी, मडगांव-गोवा यांनी आपली कन्या कु,राधिका यांचे नावे भव्य सभागृहासाठी देणगी प्रदान केली आहे. तसेच सुरेश येळदरी यांनी ही प्रेरणा सभागृहासाठी उदार हस्ते देणगी प्रदान केली आहे. अनेक ज्ञात-अज्ञात देणगीदारांनी उदार हस्ते देणगी दिली.   

 

रचना कालखंड:

सन 1968 साली शाळा सुरू झाल्यानंतर नैसर्गिक वाढीने कन्नड व मराठी माध्यमांच्या मुलांच्या मिळून एकूण इ.5 वी ते इ.10 वी सेमी इंग्रजी सह 12 वर्ग

सुरू झाले आहेत. बृहत योजनेनुसार आमच्या विद्यालयास जून 1992 मध्ये उच्च माध्यमिक 11 वी आर्टसच्या वर्गास मान्यता मिळाली. त्यानंतर विज्ञान शाखा मान्यता प्राप्त होवून आज उच्च माध्यमिक आर्टस व सायन्स.एकूण चार वर्ग सुरू आहेत.

 

Blogger द्वारे प्रायोजित.