जत | सलगर रस्त्यावरील जुगार अड्डा जागा बदलून सुरू | प्रत्येक गावात दहा-दहा अवैध धंदे : सांगा कुठेकुठे करणार कारवाई

जत,प्रतिनिधी : उमदी पोलीस ठाणे हद्दीतील ठाण्याच्या अर्धा किलोंमीटर पाठीमागून जाणाऱ्या सलगर रस्त्यावरील आंतरराष्ट्रीय जुगार अड्डा कारवाईच्या धास्तीने लमाणतांडा रोडवर जोरदापणे सुरू आहे.यापुर्वीच तेथे एक जुगार अड्डा सुरु होता.आता नव्याने हा अड्डा सुरू झाल्याची चर्चा आहे. या जुगार अड्ड्यावर दररोज सुमारे दहा लाखाची उलाढाल होत असल्याची चर्चा आहे.पोलीस दलातील विशेष पथके, वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळत असलेल्या आर्थिक पाठबळामुळे या अड्डे चालकाला बळ असल्याची चर्चा आहे. बडे हस्ती, सावकार,काही अधिकारी, या अड्ड्यावर दररोज पैसे उधळत करत आहेत.तिन पानावर चालणाऱ्या या अड्ड्यावर महाराष्ट्र कर्नाटकातील बडे हस्ती खेळण्यासाठी येत असल्याची चर्चा आहे. येथे या खेळावर दररोज दहा लाखापर्यत डाव रंगत असल्याची चर्चा आहे.
पोलीस ठाण्यात वावर असणाऱ्या एकजण तर कर्नाटकातील चडचण तालुक्यातील एकजण अड्डा चालवत असल्याचे समजते.पोलीस दलातील बड्या अधिकाऱ्यांशी थेट तडजोड असल्याने याकडे पोलीस कर्मचारी बघण्याचेही धाडस करत नसल्याचेही समोर आले आहे.येथेच या अड्डे चालकांकडून खेळाडूना व्याजाने पैसेही दिले जात असल्याची चर्चा आहे.
उमदी ठाणे हद्दीतील अवैध धंद्याने उच्चांद मांडला आहे.पोलीस ठाणे हद्दीतील जवळपास सर्वच गावात तिन पानी जुगार अड्डे राजरोसपणे सुरू आहेत.किरकोळ अड्ड्यावर छापा टाकून पोलीस आपलीच पाठ थोपटून घेत आहेत.मात्र सिमावर्ती सुमारे तीस ठिकाणी असे आंतरराष्ट्रीय तीन पानी जुगार अड्डे सुरू असून यातून दररोज कोट्यावधीची उलाढाल होत असल्याची चर्चा आहे. थेट वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी सेटलमेंट असल्याने सहसा कोणही कारवाई करण्याचे धाडस करत नसल्याचे वास्तव आहे.किरकोळ कारवाया करण्यापेक्षा बड्या अवैध धंद्यावर कायद्याचा बगडा उगारावा अशी मागणी होत आहे.
 
पाच कर्मचाऱ्यांची वेगवेगळ्या अवैध धंद्यातील वसूलीच्या नेमणूक 
 
उमदी पोलीस ठाण्यातील पाच कर्मचारी वेगवेगळ्या अवैध धंद्यातील हप्ताची वसूलीच्या कामगिरीवर नेमल्याची चर्चा आहे.जुगार अड्डे,वाळू,गांज्या,अवैध हत्यार तस्करी,मटका,गावठी दारू,अवैध प्रवासी वाहतूक,माडग्याळ, संख पोलीस चौक्या,कोतेंबोबलाद चेकपोस्ट,ठाण्यात दाखल गुन्ह्यातील तडजोडी अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या या कर्मचाऱ्यांना वाटून दिल्याची जोरदार चर्चा आहे.काहीही करा मात्र पैसे मिळाले पाहिजेत असा काहीसा पांयडा पोलीसांनी पाडल्याचे चित्र आहे.