Header Ads

तालुका कृषी विभागात नियम ढाब्यावर | सुनीता पवार,मनोज जगताप,विष्णू चव्हाण | पैसे मिळविण्यासाठी मनमानी कारभार


जत,प्रतिनिधी : जत कृषी विभागाला आलेल्या जिल्हा नियोजनमधील दीड कोटींच्या नाला खोलीकरण कामाच्या वाटपात गोलमाल झाले आहे. दीड कोटींचे कामे वाटप करताना सर्व नियम धाब्यावर बसवित मर्जीतील ठेकेदारांना कामे देण्यात आली आहेत. या सर्व कामे वाटपाची चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी जि.प. सभापती सुनीता पवार,जत पं.स. सभापती मनोज जगताप, उपसभापती विष्णू चव्हाण, जि.प. सदस्य सरदार पाटील यांनी केली आहे.
त्यांनी चौकशीच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, कामाचे नियमबाह्य वाटप करण्यात आलेल्या 55 लाखाच्या कामाची यादीच त्यांनी जिल्हाधिकारी यांच्यापुढे सादर केली. सदरची कामे वाटप करण्यासाठी तालुकास्तरावर काम वाटपाची समिती गठीत केली आहे. त्यामध्ये
तालुका कृषी अधिकारीसुद्धा आहेत.पण ही कामे वाटप होत असताना तालुका कृषी अधिकारी उपस्थित नसतानाही कामाचे वाटप झालेले आहे.सिमेंट बंधाऱ्यात जिथेपर्यंत पाणी थांबते तिथपर्यंतच नाला खोलीकरण व्हायला हवे. पण तसे झालेले नाही: जादा बिल काढण्यासाठी नाला खोलीकरणाची लांबी, रुंदी वाढविण्यात आली आहे. या कामावर जेसीबी मशीन लावताना प्रथम गावातील जेसीबी मशीन अन्यथा शेजारील गावातील जेसीबी मशीन लावण्याचा नियम होता, पण तसे न करता मर्जीतील लोकांचे मशीन लावण्यात आले आल्याचा आरोप त्यांनी केला.कामे वाटप करण्यात आलेल्या यादीत अचकनहळळी येथील कामावर धनाजी पाटील यांचे जेसीबी मशीन नियमाप्रमाणे लावायला हवे होते. पण तसे न करता डफळापूरातील रवींद्र सुतार यांची,व्हसपेठच्या कामावर यशवंत गायकवाड, पाच्छापूर येथील विक्रम पाटील यांची मशीन, हिवरे येथील कामावर येळवी येथील कपिल माने, जत येथील आश्रय बननेंवर, सुभाष राठोड, सोर्डीच्या कामावर नामदेव शिंदे, सोन्याळ येथील दावल नदाफ यांच्या मशिनी लावण्यात आल्या आहेत. आश्रय बननेवर यांच्या आई नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा आहेत.त्यांनी पदाचा गैरवापर करून लाभ घेतल्याचा आरोप त्यांनी निवेदनात केला आहे.Blogger द्वारे प्रायोजित.