Header Ads

| जत | दुकान फोडले,सावकार आई-पुत्रावर गुन्हा दाखल


 




 

जतेत दुकान फोडले,सावकार आई-पुत्रावर गुन्हा दाख

 

जत,प्रतिनिधी : येथील बसस्थानकातील कॅन्टीनमध्ये घुसून तोडफोड, मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी आईसह मुलावर जत पोलीस ठाण्यात खंडणी व खासगी सावकारीचा गुन्हा दाखल केला.याबाबतची अधिक माहिती अशी, जत बसस्थानकात सुरेश अंगडी यांचे कॅन्टीन आहे.2016 मध्ये सुरेश अंगडी यांनी जत येथील राहणारे मंजुळा लक्ष्मण सगरे व त्यांचा मुलगा रोहित लक्ष्मण सगरे याच्याकडून एस. टी.कॅन्टीनचे तीन महिन्याचे भाडे थकल्याने दहा हजार रुपये तीन टक्के व्याजाने पैसे घेतले. दहा हजार रक्कमेपोटी सगरे यांनी अंगडी यांच्याकडून 45 हजार रुपये वसूल केले. चार महिन्यांपूर्वी सर्व रक्कम देवून व्यवहारही मिटवला होता.असे असताना बुधवारी सुरेश अंगडी हे एस.टी. कॅन्टीनमध्ये बसलेले असताना रोहित हा तेथे आला व त्याने अजून व्याजाचे 17 हजार रुपये राहिले आहेत,पैसे दे म्हणत कॅन्टीनमधील कपाट फोडले तसेच अंगडी यांना शिवीगाळ करत मारहाण केली. या घटनेची गंभीर दखल पोलीस निरीक्षक शेळके यांनी घेतली.सुरेश अंगडी यांनी जत पोलीसात धाव घेतली. मंजुळा सगरे, रोहित सगरे यांना बोलावून चौकशी केली.चौकशीनंतर सुरेश अंगडी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आई व मुलावर खंडणी व खासगी सावकारीचा गुन्हा दाखल केला.दरम्यान खासगी सावकारी करणाऱ्याविरुद्ध जत पोलीस ठाण्याकडून अनेक सावकारावर कडक कारवाई करूनही सातत्याने असे गुन्हे घडत आहेत. 

 

 




 


 

Blogger द्वारे प्रायोजित.