Header Ads

उमराणीचे आरोग्य उपकेंद्र कुलूपबंद I दोन वर्षापासून कर्मचारी फिरकलेच नाहीत,नागरिकांचे हाल





 



 


उमराणी,वार्ताहर : उमराणी ता.जत येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राकडे गेल्या दोन वर्षापासून नेमलेले कर्मचारी फिरत नाहीत.परिणामी  केंद्राला अनेक दिवसापासून कुलूप लावलेले आहे.त्यामुळे उमराणी परिसरातील सहा हजार लोंकाच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.आरोग्य सुविधासाठी नागरिकांना आर्थिक मुर्दड सहन करून खाजगी रूग्णालयाचा आधार घ्यावा लागत आहे.




परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी येथे जुन्या इमारतीला नव्याने मुलामा देऊन सुसज्ज उपकेंद्र उभारण्यात आले आहे.मात्र येथे नेमलेले कर्मचारी जुन्या इमारतीत व सहा महिन्यापुर्वी नुतनीकरण केलेल्या इमारतीतही हजर नसतात. या ठिकाणी रुग्ण तपासणीसाठी असणारे डॉक्‍टरच भेटत नाहीत. वेळेवर लसीही उपलब्ध होत नसल्याच्या ग्रामस्थांमधून तक्रारी आहेत.त्यामुळे आत्ता खऱ्या अर्थाने उमराणी उपकेंद्रावर उपचार करण्याची वेळ आली असल्याचे मते ग्रामस्थांमधून व्यक्‍त होत आहे.




उमराणी व वाड्या- वस्त्यांवरील साडेेेसहा हजार लोकसंख्येचे हे गाव आहे. त्यामुळे वाड्या-वस्त्यांवरील शेतकरी, गरीब कुटुंबातील ग्रामस्थांबरोबर सर्वसामान्य नागरिक सुद्धा प्राथमिक उपकेंद्र,उमराणी येथील दवाखान्यात उपचारासाठी येतात. गर्भवती महिला, लहान मुलांना लसीकरण, औषधांसह अन्य बाबींचा लाभ यापूर्वी झाला आहे.
मात्र, सध्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्राकडे संबंधीत खात्याचे दुर्लक्ष झाले आहे. या दवाखान्याकडे संबंधीत काही कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष 




होत आहे.गेल्या अनेक दिवसापासून कर्मचारी इकडे फिरकले नसल्याने केंद्र कुलूपबंद आहे.




उमराणी गावची लोकसंख्या सुमारे साडेसहा हजारांच्या आसपास आहे. एक हजार लोकसंख्येसाठी एक याप्रकारे अशा वर्कर कार्यरत आहेत. तरी देखील  हे उपकेंद्राला दररोज कुलुपच असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या ठिकाणी या परिसरातील रुग्ण येतात.कुलूप पाहून माघारी जात आहेत.वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यांची तपासणी करून केंद्र कायमस्वरूपी चालू ठेवावे अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे.




 




 




 




दोन वर्षापासून बंद केंद्र




 




उमराणीचे आरोग्य केंद्र दोन वर्षापासून कुलूपबंद आहे.गेल्या सहा महिन्यापुर्वी या इमारतीची दुरूस्ती करण्यात आली आहे.तरीही येथे कर्मचारी फिरकले नसल्याचे ग्रामस्थ सांगतात.त्यामुळे नेमणूक केलेले कर्मचारी जातात कुठे,यावर गावातील लोकप्रतिनिधी गप्प का ?हा संशोधनाचा विषय आहे.




 

 



 

Blogger द्वारे प्रायोजित.