Header Ads

आंवढी ते जाधववस्ती(सोनंद)रस्त्याचे काम निकृष्ट | नागरिकांच्या तक्रारी बेदखल,आंदोलनाचा इशारा


आंवढी,वार्ताहर :जत तालुक्यातील आंवढी ते जाधववस्ती(सोनंद)या दोन जिल्ह्याला जोडणाऱ्या रस्त्याचे काम निकृष्ट होत असून,वरिष्ठ अधिकाऱ्यांचा ठेकेदारांना वरहस्त असल्याने नागरिकांच्या तक्रारीनंतरही कामाची गुणवत्ता राखली जात नसल्याचे आरोप आंवढीतील नागरिकांनी केली.तालुक्यातील दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या रस्त्याचे काम सुरू झाले आहे.साडे सुमारे साडेतीन किलोमीटरच्या रस्त्यासाठी मुख्यमंत्री सडक योजनेतून सव्वा दोन कोटी 17 लाखाचा निधी मंजूर झाला आहे.18 महिन्यात या रस्त्याचे काम करायची मुदत आहे.गेल्या काही दिवसापासून सांगलीतील ठेकेदारांकडून हे काम सुरू आहे.रस्त्यावर चढ,उत्तार हटवत खडीकरण करण्यात आले आहे. मात्र या खडीकरण रस्त्यावर आठ-आठ दिवस पाणी मारले जात नाही.त्याशिवाय टाकलेल्या रस्त्यावर रोलिंग व्यवस्थित केलेले नाही.त्यामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी रस्ता खालीवर दिसत आहेत.रस्त्याच्या कामासाठी लावलेल्या संदर्भदर्षक फलक नावाला दिसत आहे.फलकावर स्पष्ट केलेल्या बाबी अशा,1) आवश्यक रुंदीकरणाच्या भरावाकरीता 97/ प्रॉक्टरडेंसीटीने पाणीमारुन रोलींगकरुन 7612-52 घनमी.भरावा करणे.(673 ट्रक मुरुम माती)बाजू पट्टयाकरीता व सबग्रेडकरीता 100/. प्रॉक्टर डेंसीटीने पाणी मारुन रोलींग करुन 5241-66 घनमी.भरावा करणे.(464 ट्रक मुरुम/माती)

2) सा.क्र.0/00 ते 1/400 मध्ये 100 मी.मी.जाडीने व 3.30 मी.रुंदीने आणि सा.क्र.1/400 ते 3/230

मध्ये 125 मी.मी.जाडीने व 3-30 मी रुंदीने ग्रेड-I चा जी.एस.बी.चा एक थर1397-43 घनमी.एकूण 3.230 कि.मी. (142 ट्रकखडीव 16 ट्रक वाळू)

3) सा.क्र.0/00 ते 3-230 मध्ये 75 मी.मी.जाडीचे ग्रेड-II चे खडीकरण 3.00 मी.रुंदीने दोन थर

एकूण 1663-20 घनमी.खडीकरण (178 ट्रक खडी,43 ट्रक मुरुम) एकूण 3-230 कि.मी.करणे.

4) 20 मी.मी.जाडाने 3-00 मी.रुंदीने मॉडीफाईड पेनीट्रेशन मॅकॅडम (एम.पी.एम.)चा एक थर एकूण 3-230.कि.मी.11088.00 चौ.मी.करणे.(77 ट्रक खडी, 60/70 ग्रेडचे डांबर 19-410 मे.टन)

5) 20 मी.मी.जाडीने 3-00 मी.रुंदीने प्रिमीक्स्ड कार्पेटचा एक थर एकूण 3-250 कि.मी 11088-00चौ.मी.करणे. (27 ट्रक क्रश्ड खडी, 60/70 ग्रेडचे डांबर 16-200 मे.टन, टॅककोट साठी RS-1-2-500 मे.टन),

6) 3.00 मी.रुंदीने लिक्वीड सिलकोट टाईपचा एक थर एकूण 3-230 कि.मी.,11088.00 चौ.मी.करणे.(60/70 ग्रेडचे डांबर 10.900 मे.टन)

7)0/00 ते 3/250 लांबीमध्ये आवश्यक असणारे सर्व रोड फर्नीचर या सर्व बाबीचा उल्लेख असलेला फलक रस्ता सुरू होणाऱ्या ठिकाणी लावण्यात आला आहे. मात्र यातील निश्चित केलेल्या शासकीय नियमानुसार एकही काम झाले,नसल्याचा आरोप आंवढीतील नागरिकांनी केला आहे. रस्त्याचा दर्जा सुधारावा अन्यथा आंदोलन करू असा इशाराही देण्यात आला आहे.

 

आंवढी ते जाधववस्ती(सोनंद) या रस्ता

 

Blogger द्वारे प्रायोजित.