वैद्यकीय क्षेत्रातील सतेज दिप : डॉ.रविंद्र आरळी

जत: डॉ.रविंद्र आरळी,भाजपचे ज्येष्ठ नेते,वैधकीय क्षेत्रातील मातब्बर,जत शहरातील वैधकीय क्षेत्राला नावलौकिक मिळवून देणारे,राजकीय क्षितिजावर एक तेजस्वी व्यक्तिमत्व,आणि अग्रेसर राहायचे तर प्रथम जनसामान्यांबद्दल आस्था बाळगून जतला प्रगतीपथावर नेह्यायचे असेलतर प्रांरभी जनसामान्यांचा विश्वास संपादन करत ज्यांनी आपली कार्यपध्दती ठेवली, जत शहरात वैद्यकिय,राजकीय,शैक्षिणिक,सामाजिक व आर्थिक क्षेत्राला वेगळ्या उंचीवर नेहून ठेवले,ज्यांची आंकाक्षा जत तालुक्यात बद्दल घडवायची आहे,व वैधकीय क्षेत्रातील "आपला माणूस" अशा महान व्यक्तिमत्वाचा आज वाढदिवस त्यांच्याकार्याबद्दल थोडेसे...
जत सारख्या कायम मागास,दुष्काळी तालुक्यात डॉ.रविंद्र आरळी यांनी 1990 ला महिलासाठी दवाखाना काढून आपल्या वैधकीय सेवेस सुरूवात केली.त्याची वाटचाल करत असताना काळानुरूप नवनवे तंत्रज्ञान आकस्मसात करत जतच्या वैधकीय क्षेत्रात त्यांनी एक वेगळा मापदंड निर्माण केला आहे.समाजकार्यात येऊ पाहणाऱ्या नवयुवकांसाठी डॉ.आरळी यांचे समाजकार्य म्हणजे एक विद्यापीठच आहे.डॉ.आरळी विधायक समाजकार्याचे चालतेबोलते विद्यापीठ म्हटल्यास वावगे वाटू नये.सामान्य जनता,रुग्ण,कर्मचारी,कार्यकर्त्यावर निस्सीम प्रेम,प्रंचड समाजविधायक कार्याची जोड यामुळेच अहंकार कधीही त्यांच्या मनाला शिवला नाही.सामाजिक कार्य निरपेक्ष,नि:स्वार्थी वृत्तीने केल्याने त्यांची सतेज प्रतिमा कधीच डागळली नाही.आज समाजकार्य साठी वाहून घेतलेल्या डॉ.रविंद्र आरळी यांनी वैद्यकिय सेवा देत समाजविधायक कार्य हाती घेतले आहे.तेही ते समाजहित जपत लियालिया तडीस नेहणार यात दुमत नाही.आजच्या आधुनिक स्वार्थाने बरबटलेल्या कुरघोडीचे व विश्वासघाताचे राजकारण खेळणाऱ्या समाजात एकवचनी,नि:स्वार्थी व निरपेक्ष वृत्तीने काम करणारे समाजकारणी,राजकारणी शोधून सापडणे कठीण पंरतू जत सारख्या कायम निसर्गाच्या अवक्रपेने असणाऱ्या दुर्लक्षीत जत तालुक्याच्या क्षितिजावर असाच एक सतेज दिप डॉ.रविंद्र आरळी नाव सर्वसामान्याच्या कल्याणासाठी अखंड तेवतोय,त्याच्या कार्याची किर्ती राजभर पसरली आहे. अशा या सर्वसामान्याच्या नेतृत्वाला,आमचे मार्गदर्शक डॉ.रविंद्र आरळी यांना वाढदिवसानिमित्त व समाजकार्याला मन:पुर्वक हार्दिक शुभेच्छा.