Header Ads

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्याच्या मागणीसाठी आंदोलन


 

जत,प्रतिनिधी : मोठ्या प्रमाणात लोकवर्गणी काढून सुद्धा जतमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यासाठी चौदा वर्षे संपली तरीही पुतळा बसविला नाही.हा पुतळा तातडीने बसवावा या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे यांनी शिवाजी पेठ येथे लक्षवेधी आंदोलन केले.या आंदोलनाची सांगता अनोख्या उपक्रमांनी शिवाजी कोण होता व शिवरायांचा आठवावा साक्षेप या मोफत पुस्तक वाटपाने झाली.सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे यांनी केलेल्या लक्षवेधी आंदोलनास संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष श्रेयस नाईक,नगरसेवक प्रकाश माने,संतोष मोटे,अप्पू माळी,सलीम पाच्छापुरे,

सुधीर चव्हाण,श्रीकृष्ण पाटील,मच्छिंद्र बाबर ,सिद्धू गायकवाड,ओबीसी तालुकाध्यक्ष राजू मुल्ला,शफीक इनामदार,युवा सेनेचे बंटी दुधाळ,धैर्यशील संकपाळ,अनिकेत सरगर,विलास सरगर, रासप तालुकाध्यक्ष किसन टेंगले,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश घागरे ,  शिवाजी गडदे,शंकर वगरे अनिसचे रवी संगोलकर,युवराज जाधव,विलास काळे,शंकर पारेकर,भुपेंद्र कांबळे,गौतम ऐवळे,राहुल शिंदे,संतोष माळी,प्रमोद ऐवळे आदींनी पाठींबा दिला.यावेळी सर्वांना गोविंद पानसरे लिखित "शिवाजी कोण होता "आणि शिवरायांचा आठवावा साक्षेप या पुस्तकाच्या प्रती भेट देऊन शिवाजी महाराजांचा विचारांचा प्रसार करून प्रतीकात्मक आंदोलन करण्यात आले.

 

 

जत : येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा रखडलेला पुतळा बसवावा या मागणीसाठी विक्रम ढोणे यांनी आंदोलन केले.
 


 

Blogger द्वारे प्रायोजित.