Header Ads

युवकांना नोकऱ्या मिळवून देण्याची जबाबदारी समाजाने घेतली पाहिजे : आ.विक्रमसिंह सांवत


 
युवकांना नोकऱ्या मिळवून देण्याची जबाबदारी समाजाने घेतली पाहिजे

 

: आ.विक्रमसिंह सांवत

जत,प्रतिनिधी : मुस्लिम समाजातील मुलांना धर्माच्या शिक्षणाबरोबर सार्वजनिक शिक्षण देऊन चांगल्या नोकऱ्या मिळवून देण्याची जबाबदारी समाजाने घेतली पाहिजे, असे प्रतिपादन जतचे आमदार विक्रम सावंत यांनी जत येथे केले.
जत येथे एस. के.कॉम्प्युटर्स सेल्स अँण्ड सर्व्हिसेस या दुकानाच्या उदघाटन सोहळयानिमित्त बोलत होते. यावेळी प्रमुख उपस्थिती प्रभाकर कोळी, भुपेंद्र कांबळे, रज्जाकभाई नगारजी, सलीमभाई एन.गंवडी, सलीम भाई पाच्छापूरे, सुनिल गणेश कुलकर्णी यांची होती.
आ सावंत म्हणाले, समाजातील एकादा होतकरू विद्यार्थी आर्थिक परिस्थिती नसली तर समाजाने मदत करून चांगले शिक्षण देण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. आज मुस्लिम समाजातील अनेक युवक शिक्षणापासून वंचित राहून लहान उद्योग व्यवसाय करतात. मुस्लिम समाजातील फार कमी लोक चांगल्या हुद्याच्या नोकऱ्या करत आहेत. समाजातील मुलांना चांगल्या हुद्दाच्या नोकऱ्या मिळवून देण्यासाठी चांगले शिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याची जबाबदारी समाजाची आहे. असे मनोगत आ.सावंत म्हणाले.
शेवटी आभार सिराज मकबूल सनदी व स्वप्नील सुनिल कुलकर्णी यांनी मानले तर संयोजक आदर्श मित्रमंडळ,किस्मत मित्र मंडळ व एस.जी. ग्रुप यांनी केले.
 

जत येथील एस. के.कॉम्प्युटर्स सेल्स अँण्ड सर्व्हिसेस या दुकानाच्या उदघाटन करताना आमदार विक्रमसिंह सांवत,बाजूस सलीम गंवडी 
   
 

Blogger द्वारे प्रायोजित.