पँरालिसीस आधुनिक पध्दतीने उपचार केल्यास असा व्यक्ती पूर्ण बरा होऊ शकतो :डॉ.आविनीकुमार पाटील


जत,प्रतिनिधी : पँरालिसीस बाधित व्यक्तीवर तातडीने चार ते सहा तासाच्या आत -इंजेक्शन ऑजिमोग्रॉफी, स्टेंट बसविणे या आधुनिक पध्दतीने उपचार केल्यास असा व्यक्ती पूर्ण बरा होऊ शकतो.अशी माहिती सांगलीचे प्रसिध्द मेंदुरोग तज्ञ डॉ.आविनीकुमार पाटील यांनी दिली.ते जगदगुरु स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती निमित्य-विवेक- बसव प्रतिष्ठान जत यांच्यामार्फत जत येथे आयोजित"पॅरालिसीस समज-गैरसमज" या विषयावरील व्याख्यान संपन्न झाले.डॉ.पाटील यांनी पावर पॉईंट प्रेझेंटेशन व व्हिडीओद्वारे पँरालिसीस आज़ार होण्यामागच्या अनियंत्रित रक्तदाब व मधुमेह, घुम्रपान, मध्यपान, तणावयुक्त जीवनशैली या कारणाविषयी सविस्तर माहिती दिली.यावेळी उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे व उपाय यावर डॉ.पाटील यांनी माहिती दिली.विवेक- बसव प्रतिष्ठानच्या सचिव बालरोगतज्ञ डॉ.सौ.सरिता पट्टनशेट्टी यांनी स्वामी विवेकानंद यांचे विचार व कार्याविषयी महत्वपूर्ण माहिती दिली.विवेक बसवप्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.शालिवाहन पहाशेट्टी यांनी प्रतिष्ठानमार्फत राबविण्यात येणारे सामाजिक उपक्रम,विविध आजाराविषयी लोकामध्ये असणारे गैरसमज,अज्ञान त्याचे होणारे दुष्पपरिणाम समाजामध्ये आरोग्यविषयक जागृत्ती करणे विविध आजारावर उपलब्ध असलेल्या आधुनिक "उपचार पद्धती"चे ज्ञान ग्रामीण भागातील जनतेला मिळावे यासाठी अशी व्याख्याने आम्ही आयोजित करत असल्याचे सांगितले.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जतच्या नगराध्यक्षा सौ.शुभागी बन्नेतवर, माजी प्राचार्य डॉ. शिवाजीराव बिसले उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अँड.मुंडेचा यांनी केले. या कार्यक्रमासाठी माजी प्राचार्य रामचंद्र शितोळे, डॉ. शंकर तंगडी, डॉ.सुरभी पट्टणशेट्टी, डॉ.विद्यादर किट्टद,डॉ.रेणुका आरळी,डॉ.विद्या नाईक,प्रतिष्ठानचे सदस्य दगडू माळी,सागर पट्टणशेट्टी, डॉ.विठ्ठल बजंत्री,सुभाष पवार,सुभाष कोरे उपस्थित होते.


 


 


जत येथील विवेक-बसव प्रतिष्ठानच्या पॅरालिसीस समज-गैरसमज"कार्यक्रम प्रंसगी उपस्थित मान्यवर