अखेर बेवनूरमधिल दारू अड्डा उधवस्त : महिलांच्या तक्रारीनंतर पोलीसांना जाग,3 हजाराचा मुद्देमाल जप्त

 
अखेर बेवनूरमधिल दारू अड्डा उधवस्त

 

महिलांच्या तक्रारीनंतर पोलीसांना जाग,3 हजाराचा मुद्देमाल जप्त

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील बेवनूर येथे विनापरवाना बेकायदेशीर दारू विकणारा सचिन पोपट आलदर यास 3 हाजार रूपयाच्या मुद्देमालासह स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले.याप्रकरणी जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

बेवनूर गावात दारूविक्री जोमात सूरू असल्याने अनेकांचे संसार उध्दवस्त होत असल्याची महिलांनी मंत्रालयात तक्रार केली होती.वरिष्ठ कार्यालयाकडून कडक आदेश आल्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हा अन्वेषणनच्या पथकाने रविवारी छापा टाकला असता सचिन पोपट आलदर याच्यांकडे तीन हजार प्रत्येकी 120 रुपये किंमतीच्या 32 संत्रा देशी दारूच्या बाटल्या,रोख रक्कम जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी जत पोलिस ठाण्यात स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलिस शिपाई राजू शिरोळकर यांनी फिर्याद दिली आहे.दारू विक्रेता सचिन आलदरला ताब्यात घेतले आहे.दरम्यान तालुकाभर बेकायदा दारू विक्रीचे अड्डे उघड्यावर चालू आहेत.पोलिस निरिक्षकांना अशा बेकायदा दारू अड्ड्यावर कारवाई करण्याचे स्थानिक पोलीसांना आदेश दिले आहेत.मात्र ओटपोस्ट,बिट पोलीसांचे अर्थपुर्ण सहयोग मिळत असल्याने बेधडक दारू विक्रीने आदेशाला हरताल फासल्याचे चित्र आहे.एका गावातील दारू विक्रेत्यांवर कारवाई करून चालणार नाही.तर अनेक गावात अशा बेकायदा दारूच्या आहरी जाऊन कुंटुबे उधवस्त झाली आहे.विशेष मोहिम हाती घेऊन अशा दारू विक्रेत्यांचे अड्डे उधवस्त करावेत अशी मागणी होत आहे.