Header Ads

तीन वर्षानंतर जतेत 'ग्रामीण कौशल्य'चा मेळावा | कशी हटणार बेरोजगारी : योजनेबाबत अनास्थाजत,प्रतिनिधी : केंद्र व राज्याच्या महत्वपूर्ण, महत्कांशी दिन दयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजने अंतर्गत जिल्ह्यातील अधिकाऱ्यांमध्ये असलेल्या अनास्थेमुळे या योजनेपासून मुख्य लाभार्थीच वंचित राहिला आहे. जिल्ह्यात तीन वर्षात फक्त दहा ते बारा जणांना नोकरीची संधी मिळाली आहे.नुकताच जत पंचायत समितीमध्ये गुरूवारी प्रथमच हा मेळावा घेण्यात आला.त्यांची माहिती अनेक विद्यार्थी व पदाधिकाऱ्यांना नव्हती त्यामुळे अपेक्षित प्रतिसाद लाभला नसल्याचे चर्चा होती.जत सारख्या तालुक्यातील बेरोजगारी हटविण्यासाठी वरदान ठरणाऱ्या या महत्त्वाकांक्षी योजनेच्या माहितीपासून प्रमुख राजकीय पदाधिकारी ही दुर्लक्षित आहेत. 
गुरूवारी जत पंचायत समितीच्या आवारात विद्यार्थी वर्गाची गर्दी वाढू लागली,हे विद्यार्थी का आलेत, याची चौकशी अनेक जणांनी केली.यात जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील हे देखील होते.त्यांनी सभागृहात जाऊन याची चौकशी केली,तेव्हा जिल्हा परिषदेकडे कार्यरत असलेला ग्रामीण विकास यंत्रणा विभागाने तीन वर्षातून प्रथमच जत तालुक्यात विद्यार्थ्यांसाठी मेळावा आयोजित केल्याचे समोर आले.
दीनदयाल उपाध्याय योजनेंतर्गत ग्रामीण भागातील युवा पिढीला मोफत प्रशिक्षण देऊन हमखास रोजगार उपलब्ध करून देणे, हे एकमेव उद्दिष्ट असणारा हा मेळावा जतेत झाला.सांगली जिल्ह्याला यंदा दोनशे युवांना नोकरी देण्याचे उद्दिष्ट आहे.शासन यावर पन्नास ते साठ हजार रुपये खर्च करत आहे. मात्र, योजनाच मुळात ग्रामीण भागातील बेरोजगारापर्यत पोहोचत नसल्याने युवा पिढीचे भविष्य आजही अंधातरीत आहे. तालुक्यात हजारो सुशिक्षित युवा तरूण नोकरीच्या शोधात मुंबई, पुण्यात धक्के खात फिरत आहेत.मात्र, नोकरी मिळण्यास तयार नाही. दुसरीकडे शासन योजना राबवित असतानाही प्रशासकीय यंत्रणा काम करत नाही, हे दुर्दैवच म्हणावे लागेल. 
  
  
अशा मेळाव्याला बेरोजगार तरूणांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही.आमचे प्रयत्न सुरू असतात. तालुक्यातील बचत गटांच्या माध्यमातून युवा वर्गाला या योजनेची माहिती दिली जात आहे, अशी माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रभारी अधिकारी अतुल नांद्रेकर यांनी दिली. 
 
 
तीन वर्षापासून ही योजना राबवली जाते. मात्र, याची माहिती दिली जात नाही. दुष्काळी भागातील पिडीत तरूणांना नोकरीची गरज असताना मेळावा तीन वर्षात प्रथमच तालुक्यात घेतला जातो. हे अधिकार्‍यांच्या बेशिस्तपणाचे दर्शन घडविते.याबाबत आपण सर्वसाधारण सभेत आवाज उठवणार असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील यांनी सांगितले.
 Blogger द्वारे प्रायोजित.