Header Ads

डीजे’ची ‘क्रेझ,६ जणाचा जीवघेणी,वाळवा तालुक्यात आणखीन एका गणेशभक्ताचा मृत्यू

सांगली : गणेश उत्सव म्हणजे आंनदाचा क्षण मात्र गेल्या काही दिवसात या उत्सवाला 'डिजे' मुळे गालबोट लागत आहेत.आवाज वाढवा रे मुळे आतापर्यत ६ जणाला जीव गमवावा लागला आहे.जिल्ह्यातील शहरासह गावागावात ‘डीजे’ची ‘क्रेझ’ वाढली आहे.मात्र डिजेमुळे मोठ्या प्रमाणात धोकाही वाढला आहे.प्रंचड आवाजाच्या ठेक्यामुळे जीव गमविण्याची वेळही काही जणावर आली आहे.‘डीजे’च्या तालावर नृत्य करताना तरुणांचे बळी जात आहेत. गेल्या चार-पाच वर्षांत एका शाळकरी मुलासह सहाजणांचा ‘डीजे’च्या आवाजाने बळी घेतला आहे.

दरम्यान कालच दुधारी (ता. वाळवा) येथील गणेश मंडळाचा कार्यकर्ता प्रवीण यशवंत शिरतोडे (वय 35) याचा विसर्जन मिरवणुकी दरम्यान चक्कर येवून पडून मृत्यू झाला. डीजेच्या दणक्याने त्याचा मृत्यू झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे,हा सातवा बळी गेल्याचे समोर आले आहे.


डिजेचे लोण दिवसेन् दिवस एकीकडे वाढत आहे.त्यावर पोलीस कारवाईचेही नियंत्रण आहे मात्र उत्साही कार्यकर्त्यांमुळे आवाजाच्या सिमा ओंलाडल्या जातात.परिणामी याचे परिणाम जीवघेणे होत आहेत,याचे भान राहत नाही.पोलीसांची कारवाईतील ढिलाईमुळे 'डिजे'चे लाड वाढले आहेत.


सण, उत्सव लग्नामध्ये बँजो, बॅण्डची या पारपांरिक वाद्याची पसंती कमी झाली आहे.तर दुसरीकडे लाखो रुपयांची ‘सुपारी’ देऊन ‘डीजे’ सांगितला जात आहे. ‘डीजे’ वाजविण्यास बंदी नाही. मात्र, यासाठी आवाज मर्यादा निश्चित करून देण्यात आली आहे. त्याचे मात्र ‘डीजे’ ऑपरेटरकडून पालन केले जात नाही.उत्साही  कार्यकर्ते आवाज वाढव रे, म्हणातात,डिजे चालकही मर्यादा विसरतात.बेधुंद तरुणांना नाचत शरिराचा अक्षरक्ष: विसर पडतो,नाचण्याच्या तालात जीवघेणा शौक वाढत आहे.या आवाजाने लहान मुले, आजारी रुग्ण, वृद्धांना जीवावर बेतत असून त्याचा नाहक त्रास होत आहे.‘डीजे’च्या आवाजामुळे कानठळ्या बसतात. 

किमान दोन तास तरी कानाला ऐकू येत नाही. हृदयाचे ठोके वाढतात. छातीत अस्वस्थता जाणवते. सर्वात जास्त जन्मलेली मुले, आजारी रुग्ण व वृद्धांना याचा आवाज सहन होत नाही. गल्लीतून जरी मिरवणूक निघाली तर घरातील भांडी पडतात, इतका त्याचा भयानक आवाज आहे.


नुकतेच कवलापूर (ता. मिरज) येथे 12 वर्षाचा मुलगा विसर्जन मिरवणूक पाहण्यास गेला होता. आवाजाने त्याला हृदयविकाराचा धक्का आला. रुग्णालयात नेण्यापूर्वी त्याचा मृत्यू झाला. पाच वर्षांपूर्वी ही घटना घडली. तत्पूर्वी बुधगाव कॉलेजमध्ये एका विद्यार्थ्यांचाही अशाप्रकारे मृत्यू झाला. कुपवाड, तासगाव येथेही दोघांचा बळी गेला. दोन दिवसापूर्वी कवठेएकंद व बोरगाव येथे दोघांचा मृत्यू झाला.


डीजेबरोबर अलिकडे पेपर ब्लास्ट, स्मोक मशीन, लेसर शोचे फॅड पुढे आले आहे. पेपर ब्लास्टचा कचरा शहरात, गावागावात डोकेदुखी ठरत आहे. लेसर शोमधील तीव्र किरणामुळे अनेकांनी दृष्टी गमवावी लागली आहे. काहींना अल्प अंधत्व आले आहे.स्मोक मशीनच्या धुरामुळेह श्वसनाचा त्रास वाढत असून दमा व त्वचा विकार वाढत आहेत.आवाजाची मर्यादा ओलांडणार्‍या मंडळांवर कारवाई करण्याचे पोलिस धाडस का करीत नाहीत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आवाज तपासणीसाठी ध्वनिमापक यंत्रे आहेत. त्याचाही वापर केला नाही. पोलिसांनीच बघ्याची भूमिका घेतल्याने ‘डीजे’चा दणदणाट सुरूच आहे.हवा, पाणी, ध्वनी प्रदूषणाने जल, जंगल, जमिनीचे प्रचंड नुकसान होते.भविष्यातील धोका वाढविण्यात डिजेची भर पडली आहे. प्रदूषणामुळे संसर्गजन्य व अन्य रोगांच्या प्रसाराचे प्रमाणही वाढते. याबाबत पर्यावरणतज्ज्ञ सातत्याने धोक्याचे इशारे देत आहेत, पण लक्ष कोण देतो…?यावर लवकर उपाययोजना करणे काळाची गरज बनली आहे.

दहा मिनिटांत पोलिस हजर
अशा घटनाच्या वेळी नागरिकांच्या मदतीसाठी शासनाच्या गृहविभागाने ‘डायल 112’ हा क्रमांक सुरू केला आहे.मोबाईलवरून डायल केला तरी तो लागतो.यावर आलेल्या प्रत्येक तक्रारीची तातडीने दखल घेतली जाते. मदतीसाठी दहा मिनिटात पोलिस पोहोचतात. ‘डीजे’ चा त्रास होत असेल तर या क्रमांकावर संपर्क साधावा,असे आवाहन पोलीसांनी केले आहे.


Blogger द्वारे प्रायोजित.