Header Ads

राजे रामराव महाविद्यालयात मैदानी स्पर्धांचे आज उद्घाटन


जत : राजे रामराव महाविद्यालय, जतच्या भव्य क्रीडांगणावर दि. २ व ३ नोव्हेंबर, २०२२ रोजी होणा-या शिवाजी विद्यापीठ सांगली विभागीय मैदानी स्पर्धेचे उद्घाटन स. ९ वा. संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. राजेश रामाघरे (पोलीस निरीक्षक जत पोलीस ठाणे) व अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. सुरेश पाटील हे उपस्थित राहणार असल्याची माहिती उपप्राचार्य प्रा. सिद्राम चव्हाण यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.


      प्रा. सिद्राम चव्हाण यांनी अधिक माहिती देताना सांगितले कि, शिवाजी विद्यापीठ अंतर्गत सांगली जिल्हा विभागीय व आंतर विभागीय स्पर्धेमध्ये सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातून ४५० हून अधिक विविध खेळ प्रकारातील खेळाडू सहभागी होणार आहेत. सदर मैदानी स्पर्धेमध्ये लघु, मध्यम व लांब पल्ल्याचे धावणे, उंच उडी, लांब उडी, तिहेरी उडी, बांबु उडी, गोळा, थाळी, भाला, हातोडा फेक, अडथळा शर्यत इ. खेळ प्रकार खेळले जाणार आहेत. या मैदानी खेळाचे नियोजन प्राचार्य व उपप्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली जिमखानाप्रमुख प्रा. अनुप मुळे व प्रा. दीपक कांबळे, पाहत आहेत. 


त्यांना डॉ. राजेंद्र लवटे, डॉ. प्रकाश सज्जन, श्री. बी. के. पुजारी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी सहाय्य करत आहेत. या मैदानी स्पर्धेच्या आयोजनासाठी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिवा सौ.  शुभांगी गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कौस्तुभ गावडे, प्रशासन सहसचिव प्राचार्य राजेंद्र शेजवळ व अर्थसचिव सिताराम गवळी यांचे मार्गदर्शन लाभत आहे.


मैदानी स्पर्धेसाठी राजे रामराव महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर आखणी करताना प्रा. सिद्राम चव्हाण, डॉ. राजेंद्र लवटे, प्रा. अनुप मुळे, प्रा. दिपक कांबळे, श्री. सचिन चव्हाण, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी. 

Blogger द्वारे प्रायोजित.