Header Ads

फॅबटेक इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पूल कॅम्पस ड्राईव्हचे आयोजन



सांगोला : फॅबटेक इंजिनिअरिंग  कॉलेजमध्ये पूल कॅम्पस ड्राईव्हचे आयोजन दि.३ नोव्हेंबर २०२२ रोजी कोल्ब्रो ग्रुप प्रा. लि. नाशिक यांचे तर्फे करण्यात येणार आहे. यामध्ये  डिग्री व डिप्लोमा  सिव्हील इंजिनिअरिंगचे विद्यार्थी मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकतील असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर बी शेंडगे यांनी सांगितले. नाशिक मधील कोल्ब्रो या नामांकित कंपनीसाठी  मराठी, हिंदी व इंग्रजी लेखन कौशल्य असणाऱ्या विद्यार्थ्यांची आवश्यकता आहे. 


डिप्लोमा सिव्हील इंजिनिअरिंग व डिग्री सिव्हील इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना  योग्य पेमेंट  देण्यात येणार आहे. या साठी पुरुष उमेदवार यांना प्राधान्य दिले जाणार आहे. सर्व उत्तीर्ण व अंतिम वर्षात शिकत असणारे विद्यार्थी या मुलाखतीस उपस्थित राहू शकतात असे ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफिसर  डॉ. साहेबगौडा संगणगौडेर यांनी सांगितले .विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी प्रा. दुधाळ सर (९६३७८३७८१९) यांच्याशी  संपर्क साधावा.


Blogger द्वारे प्रायोजित.