Header Ads

रामराव विद्यामंदिरमध्ये ज्ञानेश्वर स्मृति व्याख्यानमालेचे आयोजन


जत ;जत येथील श्री रामराव विदयामंदिर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या वतीने 20,21 आणि 22   नोव्हेंबर या कालावधीत श्री ज्ञानेश्वर स्मृति व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. संध्याकाळी सहा ते साडेसात या कालावधीत होणा-या या व्याख्यानमालेत विविध विषयांवर व्याख्याने होणार आहेत. 


व्याख्यानमालेचे पहिले पुष्प शरद जाधव (धनगाव) हे गुंफणार असून ते 'सुख म्हणजे नक्की काय असत ?' या विषयावर बोलणार आहेत. दुसरे पुष्प डॉ.अनिल मडके  हे 'कोविड नंतरचे जग' या विषयावर गुंफणार आहेत तर तसरे पुष्प औदुंबर (सांगली)  येथील वासुदेव जोशी हे 'श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी आणि संजीवन समाधी सोहळा' या विपयावर गृंफणार आहेत. या व्याख्यानमालेचा लाभ घेण्याचे नागरिक, विद्यार्थी आणि जाणकारांनी घ्यावे ,असे आवाहन प्राचार्य शिवाजी शिंदे यांनी केले आहे. 

ज्ञानेश्वर स्मृति व्याख्यानमालचे हे 28 वे वर्ष असून जत येथील आध्यात्मिक व्यासपीठ म्हणून या व्याख्यानमालेकडे पाहिले जाते. आत्तापर्यंत बाबामहाराज सातारकर, विश्वेष बोडस, अनंत दिक्षीत, डॉ.यु.म.पठाण. प्रा.सु.ग.शेवडे, प्राचार्य शिवाजीराव भोसले, दादामहाराज मनमाडकर, वा.ना.उत्पात, रामचंद्र देखणे. इंद्रजित देशमुख, रामचंद्र पाटील,जयदिप पाटील, आप्पासाहेब खोत, अरुण डबीर, श्रीमंत कोकाटे आदींच्या व्याख्यानांचा लाभ जतकरांना झालेला आहे. दिनांक 22 रोजी संजीवन समाधी सोहळयादिवशी म्हणजे तिस-या पुष्पाने व्याख्यानमालेची सांगता होणार आहे. 
Blogger द्वारे प्रायोजित.