Header Ads

डफळापूर येथे माता गटाना भेटूया संवाद कार्यक्रमाचे आयोजन


डफळापूर : भारत सरकार च्या निपूण भारत अंतर्गत मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान अंतर्गत दिं १४ नोव्हें २०२२ ते २० नोव्हें २०२२ अखेर माता गटांना भेटूया निपूण महाराष्ट् घडवूया ! या भेटी दरम्यान इयत्ता १ ली ते ३ री मधील  विद्यार्थी पालक, शाळा, शिक्षक, समाज या सर्वांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी गांव, वस्ती, मध्ये मातांचे गट तयार केले असून आठवड्यातून व्हिडीओ मिळतो का ? व व्हिडीओ प्रमाणे कृती होते का ? शिक्षक व इतर मंडळींचे सहकार्य या बाबत संवाद साधण्यात आला.


लिडर मातांच्या माध्यमातून लहान मुलामध्ये वाचन, अकलन, लेखन, संख्या परिसरातील विविध वस्तूतून सहाध्यायी शिक्षण देण्याचे कार्य गांवा गावा मध्ये सुरु असून मुलांने घरी शिकणे यामध्ये माता पालकांची भुमिका महत्वाची आहे,असे मत शिक्षण विभाग पंचायत समितीचे विषयतज्ञ सुरेंद्र सरनाईक यांनी डफळापूर जिप शाळा नं १ येथे माता मेळावा संवादामध्ये व्यक्त केले. यावेळी माता सौ सुनिता सागर महाजन,सौ.अरुणा रणजीत चव्हाण, सौ.शामल पाटील,सौ.मोनाली विनोद व्हनखंडे, सौ.शितल कोळी, सौ. अमृता बेळुंखे, सौ.दिपाली शेळके यांनी संवादामध्ये भाग घेतला.


कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सागर महाजन, सौ.सोनाली प्रशांत चव्हाण मुख्याध्यापिका श्रीम शाहिरा बानू इनामदार व सर्व माता उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन श्रीम राजमती  देसाई, श्रीम वनिता कोल्हे, श्रीम अमिना मुल्ला,श्रीम निता कोरे, संजय राठोड सर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक व आभार श्रीम अजेंता लोंढे मॅडम यांनी केले.


डफळापूर येथे माता गटाना भेटूया संवाद कार्यक्रमात मार्गदर्शन करताना विषयतज्ञ सुरेंद्र सरनाईक

Blogger द्वारे प्रायोजित.