Header Ads

संत शिवलिंगव्वा यांच्या ९२ वा पुण्यतिथी सोहळ्यास गुरुवारपासून प्रारंभ


जत : जत येथील थोर तपस्वी संत शिवलिंगव्वा यांचा ९२  पुण्यतिथीनिमित्त सप्ताह सोहळा गुरुवार दि.३ नोव्हेंबर ते बुधवार दि.९ अखेर साजरा होणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

संत शिवलिंगव्वा यांचे जत येथील बसवेश्वर मंदिराजवळ मंदिर व समाधी आहे.त्या उमदीचे संत भाऊसाहेब महाराज उमदीकर यांच्या शिष्या असून मठाच्या वतीने दरवर्षी पुण्यतिथीनिमित्त सप्ताह सोहळा साजरा करण्यात येतो.गुरुवार दि ३ नोव्हेंबर ते बुधवार दि. ९अखेर दररोज सायंकाळी ६ ते ९वाजता  सद्गुरु सेवा मंडळ जतच्या वतीने दासबोध वाचन ,भजन व आरतीचा कार्यक्रम  होणार आहे.

बुधवार दि ९ रोजी आरती व मंत्रपुष्पांजली होऊन दुपारपासून महाप्रसादाचे आयोजन आहे.या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन  मठाचे मठाधिपती महादेव स्वामी व श्री संत शिवलिंगव्वा प्रतिष्ठान तसेच भजनी मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Blogger द्वारे प्रायोजित.