Header Ads

जिल्हास्तरीय शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धेत जत तालुक्यातील आटपाडकर, श्रीमती मकानदार प्रथम


जत ; सांगली जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्यावतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शैक्षणिक साहित्य निर्मित स्पर्धेत द्विशिक्षक शाळा गटात जत तालुक्यातील चव्हाण वस्ती शाळा नं. 1 येथील शिक्षक राजू आटपाडकर आणि बहुशिक्षकी शाळा गटात मिरवाड येथील  श्रीमती फरहाना अमीन मकानदार यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन केले.


जिल्हास्तरीय शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धा नुकत्याच सांगली येथे पार पडल्या. द्विशिक्षकी, बहुशिक्षकी आणि तंत्रज्ञानावर आधारित अशा विविध गटात स्पर्धा घेण्यात आल्या. द्विशिक्षकी शाळा गटात चव्हाणवस्ती नं. 1 (ता.जत ) येथील राजू सुखदेव आटपाडकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक साळशिंगे ( ता. खानापूर) येथील शिक्षक सदानंद मुकुंद रोकडे यांनी तर तृतीय क्रमांक  सावंतवाडी ( ता. मिरज) येथील श्रीमती रिजवाना राजू बागारे यांनी पटकावला. 


तसेच श्रीमती आरती अरुण भिंगारदेवे (मुल्लानगर- खानापूर), दत्तात्रय वसंत जवळे (भवानीनगर -तासगाव), श्रीमती वैशाली अजय राक्षे (गवरचिंच- आटपाडी) यांनी उत्तेजनार्थ बक्षिसे मिळवली.बहुशिक्षकी शाळा गटात श्रीमती फरहाना अमीन मकानदार (मिरवाड -जत) यांनी प्रथम, श्रीमती सुप्रिया बाबासो बाबर (कुर्ली- खानापूर) यांनी द्वितीय तर श्रीमती कविता तात्यासाहेब पाटील (कणदूर- शिराळा) यांनी तृतीय क्रमांक पटकावला. तसेच उत्तेजनार्थ बक्षिसे तानाजी कोडग (ढालेवाडी- कवठेमहांकाळ), श्रीकांत शंकर सोनार (काराजनगी -जत) आणि श्रीमती वैशाली जाधव ( बेडग नं. 1- मिरज) यांनी मिळवला.


तंत्रज्ञानावर आधारित साहित्य स्पर्धेत अविनाश अशोक पाटील (शिरोळ खुर्द- शिराळा) यांनी प्रथम, अमोल किसन हंकारे (कुची नं. 1- कवठेमहांकाळ) यांनी द्वितीय तर परशुराम ज्ञानू शिंदे (आरग नं. 1- मिरज) यांनी तृतीय क्रमांक पटकावला. तसेच श्रीमती समीना नजीर खलिफा (उर्दू बिळूर -जत), महादेव भीमराव तोडकर (हिंगणगाव- कडेगाव), सूरज युसुफ शिकलगार (हणमंतपूर- तासगाव) यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळवले. विजेत्या शिक्षकांचे अभिनंदन होत आहे.
Blogger द्वारे प्रायोजित.