Header Ads

लम्पी आजाराची जनावरे मोकाट,कवठेमहांकाळ मधील धक्कादायक प्रकार


कवठेमहांकाळ : शहरात देशिंग कॉर्नर परिसरात लम्पी आजाराने त्रस्त एक वासरू फिरत असल्याची धक्कादायक वस्तुस्थिती आज दिनांक १८ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास समोर आली आहे.त्यामुळे जनावरांचा कोविड अर्थातच लम्पी या आजाराबाबत कवठेमहांकाळ येथील पशुसंवर्धन विभाग फारसा गंभीर नसल्याचे दिसून येते.पशुसंवर्धन विभागासोबतच या जनावरांकडे नगरपंचायत प्रशासनानेही पाठ फिरविल्याचे चित्र आहे.


                गेल्या जवळपास एक महिन्यापासून महाराष्ट्र राज्यात जनावरांच्या लम्पी आजाराने थैमान घातले आहे.सांगली जिल्ह्यातही या आजाराचा वाढता प्रकोप आहे.मात्र,अशाही परिस्थितीत पशुसंवर्धन विभागाकडून जनावरांच्या लम्पी आजाराला गांभीर्याने घेतले नसल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर येत आहे.लम्पी आजाराने ग्रस्त जनावरे कवठे महांकाळ शहर आणि परिसरात चक्क मोकाट फिरताना आढळून येत आहेत.


              शहरातील देशिंग कॉर्नर परिसरात जास्त दवाखाने असलेल्या गर्दीच्या ठिकाणी लम्पीच्या जनावरांचा मुक्त संचार वाढला आहे.मात्र पशुसंवर्धन विभागाकडून कोणत्याही प्रकारची दक्षता घेतली जात नसल्याचे दिसून येते.जनावरांमध्ये लम्पी आजाराची लागण मोठ्या प्रमाणावर झाली आहे,अशा ठिकाणी विलगीकरण कक्ष उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आली आहे परंतु, मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला कवठे महांकाळमध्ये केराची टोपली दाखविण्यात येत असल्याचे चित्र आहे.
Blogger द्वारे प्रायोजित.