Header Ads

आशा वर्कर्स व गटप्रवर्तकांचे प्रश्न सोडवा,जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन


सांगली :- लाल बावटा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियन च्या वतीने जिल्हाधिकारी डॉ.राजा दयानिधी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. आशा स्वयंसेविका यांच्या प्रश्नाबाबत ही निवेदन देण्यात आले. 

आशा स्वयंसेविकांना बी एल ओ चे काम काही ठिकाणी सक्तीने लावले जात आहेत, ते लावण्यात येऊ नये.आशा स्वयंसेविका या मानधन तत्वावर काम करत आहेत. नगरपालिका/नगरपरिषद कोरोना कामाचा प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा,असे निवेदनात‌‌ म्हटले आहे.


जिल्हा आरोग्य अधिकारी यांना ही देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  आभा कार्ड काढण्यासाठी आशा स्वयंसेविकांना सक्तीने कामे लावली जात आहे,या कामाचा मोबदला देण्यात यावा.NCD चे काम पूर्वी ऑफलाइन केले आहे, तेच काम परत ऑनलाइन करण्यासाठी सांगितले जात आहेत,हे अन्यायकारक आहे,अशा मागण्याचे निवेदन देण्यात आले.कॉ हणमंत कोळी ,सुरेखा जाधव विनायका शेटे, प्रिती सावंत उपस्थित होते.
Blogger द्वारे प्रायोजित.