Header Ads

करजगी येथे रास्त भाव दुकानातून 'दिवाळी कीट'चे वाटप


करजगी : करजगी (ता.जत)येथील सर्वसामान्य आणि गरिबांचे दिवाळी गोड व्हावे यासाठी राज्य शासन रास्त भाव दुकानचा माध्यमातून अंत्योदय,केसरी, पिवळे, रेशन कार्डधारकांना दिवाळी किट घेण्याबाबतची, घोषणा केली होती.त्यानुसार जत तालुक्यात हे किट वाटप ‌करण्यात येत‌ आहे.करजगी येथील रास्त भाव दुकानातून किट वाटपास सुरवात करण्यात आली.


 सामान्य कुटुंबाला त्यांचे दिवाळी सुखकर व गोड व्हावे या उद्देशातून अवघ्या 100 रुपयांमध्ये एक किलो साखर, हरभरा डाळ एक किलो, रवा एक किलो, पामतेल एक किलो रास्त भाव दुकानातून देण्याच्या निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.राज्य सरकारने घेतलेले या निर्णयामुळे लाखो कुटुंबाचे दिवाळी गोड होणार आहे. सरकारमान्य रास्त भाव दुकानमध्ये दिवाळी किट वाटप वितरण चालू आहे.ग्रामीण भागातील नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

Blogger द्वारे प्रायोजित.