Header Ads

माडग्याळच्या समर्थ क्लिनिकल लँबोरेटरीचा गौरव


माडग्याळ : माडग्याळ ता.जत येथील श्री समर्थ क्लिनिकल लँबोरेटरीचे मालक नेताजी खरात व सौ.कविता खरात यांना ग्रुप ऑफ मिडिया व स्वराज्य मराठी न्यूज चँनेलचा आदर्श लँबोरेटी हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

खासदार धैर्यशील माने,सिने अभिनेत्री प्राजक्ता नवनाळे,वैभव शिंदे यांच्याहस्ते हा पुरस्कार देऊन खरात दांपत्याचा गौरव करण्यात आला.समर्थ क्लिनिकल लॅबोरेटरी ही गेली पंधरा वर्षापासून माडग्याळ सारख्या दुष्काळी भागामध्ये गोरगरीब रुग्णांना सवलतीच्या दरामध्ये सेवा देत आहेत.अपंग व मतिमंद लोकांसाठी मोफत सेवा देते.या लॅबोरेटरीमध्ये सर्व तपासण्या अत्याधुनिक मशीनद्वारे करून अचूक निदान केले जाते.

जत पूर्व भागामध्ये अशी एकमेव लॅबोरेटरी अशी आहे,की सरकारमान्य नोंदणीकृत आहे.यावेळी डॉ.सार्थक हिट्टी,गणेश पवार,सुभाष मोरे, अंबाना माळी, सुरेश माळी आदी मान्यवर उपस्थित होते.
Blogger द्वारे प्रायोजित.