Header Ads

तीन वर्षे पूर्ण केलेल्या शिक्षण सेवकांना नियमित वेतन देणार - जितेंद्र डुडी यांचे आश्वासन


जत,संकेत टाइम्स : तीन वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षणसेवकांना ऑक्टोबर 2022चे वेतन नियमित वेतनश्रेणीत मिळणार मुख्य कार्यकारी अधिकारी मा.जितेंद्र डुडी यांची शिक्षक भारती संघटनेला ग्वाही दिली असल्याची माहिती शिक्षक भारतीचे जत तालुकाध्यक्ष दिगंबर सावंत यांनी दिली.

शिक्षकांच्या प्रश्नांबाबत शिक्षक भारती संघटनेने मुख्य कार्यकारी जितेंद्र डुडी यांना निवेदन पाठवून शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याबाबत विनंती केली.सप्टेंबर 2022 मध्ये तीन वर्षे सेवा पूर्ण झालेल्या शिक्षण सेवकांचे नियमीतीकरणाचे प्रस्ताव मंजूर करणेबाबत शिक्षक भारती संघटनेने वेळोवेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी ,शिक्षणाधिकारी मोहनराव गायकवाड यांचेकडे पाठपुरावा केला आहे.

सप्टेंबर 2019 मध्ये सेवेत आलेल्या शिक्षण सेवकांचा तीन वर्षे हा कालावधी संपलेला आहे.साधारणत: 400 शिक्षण सेवकांचे नियमितीकरणाचे प्रस्ताव मंजूरीच्या अंतिम टप्प्यात आहेत.नियमितीकरणाचे प्रस्ताव लवकरच मंजूर होतील.तीन वर्षे सेवा पूर्ण झालेल्या शिक्षणसेवकांचे ऑक्टोबर 2022 चे वेतन हे नियमित वेतनश्रेणीत मिळावे ही मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांचेकडे शिक्षक भारती संघटनेचे सरचिटणीस कृष्णा पोळ यांनी केली असता मुख्य कार्यकारी डुडी यांनी हा प्रश्न तात्काळ मार्गी लावणार अशी ग्वाही दिली.



वरिष्ठ वेतनश्रेणी 12 वर्षे सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांचे वरिष्ठ वेतनश्रेणीचे प्रस्ताव मंजूर करणेबाबतची मागणी शिक्षक भारती संघटनेने प्रश्न मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांचेकडे केली आहे.तो प्रश्नही तात्काळ सोडवला जाईल असे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले आहे.

Blogger द्वारे प्रायोजित.