युवा उद्योजक समाधान जगताप उत्कृष्ट चेअरमन पुरस्काराने सन्मानित
जत : कोल्हापूर येथे दैनिक सकाळ समूहामार्फत दिला जाणारा आयडॉल महाराष्ट्र(उत्कृष्ट चेअरमन आवर्ड) हा पुरस्कार जिव्हाळा व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन, जिव्हाळा उद्योग समूहाचे संस्थापक डॉ. समाधान जगताप, संचालिका सौ. अनिता जगताप यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत स्वीकारला. त्यांच्यासमवेत यशराज जगताप, साक्षी जगताप, शिवशंभो मल्टीस्टेटचे लक्ष्मण बोराडे आदीं उपस्थित होते.
या पुरस्काराचे वितरण बँकिग क्षेत्रातील जाणकार व सहकार परिषदेचे अध्यक्ष विद्याधर आनास्कर, सकाळ समूहाचे संपादक श्रीराम पवार ,दैनिक सकाळचे सहसंपादक शेखर जोशी यांच्याहस्ते करण्यात आले. पुरस्कारामुळे डॉ.जगताप यांचे सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे. येळवी (ता.जत) सारख्या ग्रामीण भागात आपल्या उद्योग उभारणीचा श्रीगणेशा करून सामाजिक स्थितीला दोनहात करत डॉ.जगताप उद्योग उभारले आहेत.त्यांच्या प्रत्येक क्षेत्रातील उद्योग समूहातील क्षितिजाची कक्षा रुंदवत , नवनिर्मितीचे बळ घेऊन सहकार , दुग्ध ,सामाजिक, बिल्डिंग कंट्रक्शन, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक मोटर्स या उद्योग समूहाची उभारणी करत दैदीप्यमान यश संपादन केले आहे.
जिव्हाळा सहकारी पतसंस्थेची मुहूर्तमेढ सन २०१८ साली रोवली गेली. याच संस्थेने एक कोटीच्या ठेवीचा टप्पा नुकताच पार केला आहे. ८० लाख हून अधिक कर्ज वाटप करण्यात आले आहेत.८३९ सभासद आहेत. या कर्ज वाटपामुळे लघु उद्योजक, बचत गट, छोटे छोटे व्यवसायिक यांना चांगला आधार मिळाला आहे. प्रत्येक उद्योग व व्यवसाय यांची क्षितिजापार प्रगती जगताप यांनी पूर्ण केली आहे.तालुक्यातील युवा उद्योजक व जिव्हाळा ब्रँड या नावाने त्यांची ओळख बनली आहे. भविष्यात उद्योग समूहाच्या माध्यमातून लोकोपयोगी ब्रँड निर्मितीस भर देणार असल्याचे डॉ.जगताप यांनी सांगितले.
जत ; जत येथील युवा उद्योजक डॉक्टर समाधान जगताप यांना सकाळ समूहाचा उत्कृष्ट चेअरमन महाराष्ट्र आयडॉल पुरस्काराने सन्मानित करताना सकाळ समूहाचे संपादक श्रीराम पवार,सहकार परिषदेचे अध्यक्ष विद्याधर आनास्कर, शेखर जोशी आदी.