Header Ads

नूतन कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये जागतिक औषधे निर्माता दिवस उत्साहात साजरा



कवठेमहाकांळ : शिक्षण पंढरी म्हणून ओळखली जाणारी संस्था म्हणजेच आपली राष्ट्रीय आरोग्य न्याय संशोधन संस्था या संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर नूतन माळी सेक्रेटरी डॉक्टर रामलिंग माळी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्राचार्य डॉक्टर अमोल पाटील सर व उपप्राचार्य प्रमोद चिकोडी यांनी आज कवठेमंकाळ येथे जागतिक औषधे निर्माता दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.



प्राचार्य अमोल पाटील सर यांनी विद्यार्थ्यांनी समाजामध्ये फार्मसीचे महत्त्व कसे टिकून ठेवले पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले.कवठेमहांकाळ केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष निकम यांनी मुलांना मार्गदर्शन केले तसेच मुलांना आपल्या आयुष्यातील अनुभव सांगितले



या कार्यक्रमास मध्ये प्राध्यापक सुहास माने यांनी जगभरामध्ये औषध निर्माता दिवस हा 25 सप्टेंबर दिवशी साजरा केला जातो हे सांगितले. कारण तुर्की येथे इंटरनॅशनल फार्मासिटिकल फेडरेशन एफ आय पी 2009 मध्ये 25 सप्टेंबरला वर्ल्ड फार्मासिस्ट डे औषध निर्माता दिवस डब्ल्यूपीडी म्हणून नियुक्त केले देशाच्या कानात कोपऱ्यात आरोग्य सुधारण्यासाठी औषध निर्मात्याच्या भूमिकेला प्रोत्साहन व समर्थन देणारे उपक्रम आयोजित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो असे सांगितले मागील दोन वर्षापासून जगभरात कोरोना व्हायरस संकट घोंगावत असताना अनेक औषधी निर्माता दुकानदारांनी त्यांची दुकान अहोरात्र खुली ठेवली होती. संसर्गाची भीती असूनही अनेकांनी घरपोच औषधे पुरवली होती असे मत प्राध्यापक सुहास माने यांनी मांडले.



          जागतिक औषध निर्माता दिवसानिमित्त नूतन कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कवठेमहांकाळ शहरातून भव्य अशी औषध जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीतून  लोकांमध्ये जनजागृतीसाठी चौका चौकात औषधांचे दुष्परिणाम औषधांचे डोस पेशंट कौन्सिलिंग या विषयावर पथनाट्य सादर करण्यात आली. तसेच महाविद्यालयांमध्ये फार्मसी अंतर्गत चित्रकला स्पर्धा. तसेच ऑफलाईन फार्मसी आणि ऑनलाईन फार्मसी विषयी वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.    
Blogger द्वारे प्रायोजित.