फॅबटेकच्या राहुल जावीरची कॅपजेमिनी कंपनीमध्ये निवड
सांगोला : फॅबटेक टेक्निकल कॅम्पस - कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चच्या कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागातील राहुल जावीर या विद्यार्थ्याची कॅपजेमिनी या नामांकित कंपनीमध्ये निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर बी शेंडगे यांनी दिली. या विद्यार्थ्यास वार्षिक ४ लाख इतके पॅकेज मिळाले आहे. कॅपजेमिनी ही एक बहुराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान सेवा आणि सल्लागार कंपनी असून, कंपनीचे मुख्यालय पॅरिस, फ्रान्स येथे आहे, अशी माहिती कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागाचे विभागप्रमुख प्रा. पराग दौंडे यांनी दिली.
या विद्यार्थ्याचे संस्थेचे चेअरमन भाऊसाहेब रुपनर व मॅनेंजिग डायरेक्टर अमित रुपनर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी संस्थेचे कार्यकारी संचालक दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर संजय अदाटे, अकॅडमिक डीन प्रा. तात्यासाहेब जगताप, डीन क्वालिटी अशुरन्स प्रा. डॉ.एन जी नार्वे, ट्रैनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी प्रा.डॉ.साहेबगौडा संगणगौडर, सर्व विभाग प्रमुख व प्राध्यापक यांनीही अभिनंदन करून पुढील कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या.