Header Ads

राष्ट्र उभारणीत रासेयोचे महत्त्वाचे योगदान: डॉ. राजेंद्र लवटेजत : राष्ट्रीय सेवा योजना ही एक सामाजिक चळवळ असून या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडवण्याबरोबरच राष्ट्र उभारणीमध्ये महत्त्वाचे योगदान आहे, असे प्रतिपादन डॉ. राजेंद्र लवटे यांनी व्यक्त केले. ते राजे रामराव महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास मंडळ व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दहा दिवसीय विद्यार्थी उद्बोधन वर्गामध्ये राष्ट्र उभारणीत राष्ट्रीय सेवा योजनेचे योगदान या विषयावर प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते. यावेळी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. (डॉ) सुरेश पाटील उपस्थित होते.
        
पुढे बोलताना ते म्हणाले की राष्ट्रप्रेम, देशसेवा, स्वच्छता, साफसफाई व समाजसेवा यामुळे विद्यार्थी दशेपासूनच राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून पोहोचवली जातात. आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य प्रा. (डॉ) सुरेश पाटील म्हणाले, राष्ट्र उभारणीचा पाया म्हणून महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग सातत्याने महाविद्यालयीन परिसराची स्वच्छता करून आपली सामाजिक जबाबदारी पार पाडत आहे. विविध कार्यक्रम व श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली आहे. 
   
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. पुंडलिक चौधरी, आभार डॉ. शंकर गावडे तर सूत्रसंचालन डॉ. सतीशकुमार पडोळकर यांनी केले. या कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. तुकाराम सन्नके, समितीचे सर्व सदस्य, महाविद्यालयातील इतर प्राध्यापक व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Attachments area
Blogger द्वारे प्रायोजित.