Header Ads

JATH | सतत पावसामुळे उडीद पिकाचे नुकसान

 


सतत पावसामुळे उडीद पिकाचे नुकसान

जत - शहर व परिसरात बुधवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. वातावरणात अचानक बदल झाला.गुरूवारी दिवसभर कडक ऊन तर गुरूवारी ढगाळ वातावरण,दिवसभरात अधुनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत.गत महिन्यापासून पावसाने शेतकऱ्यांना चांंगली साथ दिली आहे.तर काढणीला आलेल्या उडीद पिकाचे सततच्या पावसामुळे नुकसान होत आहे.

महाविद्यालयात गर्दी  

जत - शहरातील राजे रामराव महाविद्यालयाच्या परिसरात पहाटेच्या वेळी फिरायला येणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. व्यायाम, पोलिसभरतीचा सराव व फिरायला येणार्‍यांची संख्या राजवाडा परिसर सांगली रोड, गीता आश्रम , वसतीगृह या परिसरात मोठय़ा प्रमाणावर आहे. यामुळे सकाळच्या व सांयकाळीच्या वेळी रेलचेल वाढली आहे.

फळांच्या खरेदीत वाढ
जत - शहरातील स्टँड समोर ,मंगळवार पेठ ,मार्केट कमिटी इमारती समोर ,मुख्य बाजारपेठेत उभ्या राहणार्‍या हातगाड्यांवर नागरिकांची श्रावण महिन्यामुळे फळ खरेदीसाठी गर्दी होत आहे.सफरचंद,केळी,डाळिंब, मोसंबी, चिकू खरेदीकडे ग्राहकांचा कल दिसून येत आहे.

पथदिवे बंद
जत - शहरातील औद्योगिक वसाहतीतील काही रस्त्यांवर बसविलेले पथदिवे बंद आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ही समस्या कायम आहे. यामुळे रोजंदारीवर काम करणार्‍या कर्मचारी, महिला वर्गाला ये-जा करताना अडथळा निर्माण होत आहे. किरकोळ चोरीच्या घटना पथदिवे बंद असल्याने घडत आहेत.

रस्ता उखडला
जत- शहरातून जाणाऱ्या जत बिळूर,जत-डफळापूर रस्ता जागोजागी उखडला आहे. यामुळे वाहनधारकांची गैरसोय होत आहे. रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

Blogger द्वारे प्रायोजित.