Header Ads

जत तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्राथमिक गटात कु. सुहाना खान, तर उच्च प्राथमिक गटात अमीन पखाली प्रथम


जत ; जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जत नं 1 ची विदयार्थीनी कु. सुहाना नौशादअहमद खान हिने प्राथमिक गटात तर डफळापूर येथील  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं 1 चा विदयार्थी अमीन मन्सूर पखाली  याने उच्च प्राथमिक गटात तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. 

 विदयार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी व सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी जिल्हा परिषद सांगली शिक्षण विभागाच्या वतीने जिल्हाभर विविध शालेय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने कथाकथन,  वक्तृत्व, गायन,  लोकनृत्य, एकांकिका, इंग्लिश लँग्वेज काॅम्पीटीशन इत्यादी स्पर्धेचा समावेश करण्यात आला आहे. प्रथम केंद्र स्तरावर स्पर्धा घेण्यात आल्या. यातील पहिल्या क्रमांकाचे स्पर्धक तालुका स्तरावर निवडले गेले. पंचायत समिती शिक्षण विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा  जत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं 1  या ठिकाणी पार पडल्या. त्यामध्ये प्राथमिक गटात एकुण 11 स्पर्धेकांनी आपला सहभाग नोंदवला. तर उच्च प्राथमिक गटात 13 स्पर्धेक सहभागी झाले होते. 

प्राथमिक गटात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं 1 ची विदयार्थीनी कु. सुहाना नौशादअहमद खान प्रथम,  कु. श्रेया बसाप्पा बिदरी ( जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिप्परगीवस्ती कन्नड  ) हिने द्वितीय तर कु.संस्कृती महादेव हिप्परकर ( जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोकाशीवाङी ) हिने तृतीय क्रमांक पटकावला. उच्च प्राथमिक गटात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं 1 ङफळापूर चा विदयार्थी अमीन मन्सूर पखाली याने प्रथम,  कु.कोमल रायाप्पा होनवाडे ( जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवनाळ ) हिने द्वितीय तर तृतीय कु. रश्मी दत्तात्रय कुंडले ( जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जालिहाळ बु. )  हिने तृतीय क्रमांक पटकावला. 


परीक्षक म्हणून ए.के.सावंत,  एन.एस.तुराई, एस.जी.कुंभार, एस.एन.सरक, एस.एम.माळी, एस.एस.शिंदे यांनी काम पाहिले. स्पर्धेचे नियोजन संभाजी कोडग, रतन जगताप, विशाल चिपडे आदींनी केले. तालुक्यातील शिक्षक वृंद , पालक व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेस हजेरी लावली होती.
Blogger द्वारे प्रायोजित.