Header Ads

बिळूर परिसरातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी : प्रकाश जमदाडे | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली मागणी
जत : जत तालुक्यातील बिळूर ,खोजानवाडी ,मेंढीगिरी ,रावळ गुंडवाडी, मूचंडी,डफळापूर ,जिरग्याळ या परिसरामध्ये 5 ऑगष्टला अतिवृष्टीमुळे शेतातील पिके,घरे तसेच शेतातील बांध फुटल्याने माती वाहून गेल्याने या भागात खूप मोठे नुकसान झाले आहे.या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी जिल्हा बँक संचालक प्रकाश जमदाडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांच्याकडे ई मेल करून निवेदनाद्वारे केली आहे. 


निवेदनात म्हटले आहे,८ ऑगष्ट रोजी बिळूर परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला,त्यामुळे पिंकाचे मोठे नुकसान झाले आहे.अनेक ठिकाणी पिके वाहून गेली आहेत.पाणी थांबून राहिल्याने पिके कुजली आहे,घराचीही पडझड झाली आहे.तसेेच यापूर्वी ही बिळूर भागात गतवर्षी 20 व 21 नोंव्हेबरला झालेल्या गारपिटीमुळे द्राक्ष बागेचे अतोनात नुकसान झाले होते,त्याचे पंचनामे होऊनही अद्याप नुकसान भरपाई मिळाली नाही.

त्यामुळे दोन्ही वर्षाची नुकसान भरपाई सरकारने द्यावी.दरम्यान हवामानातील बदलाची माहिती 2 दिवस अगोदर मिळणेसाठी तालुक्यात नवीन तंत्रज्ञान विकसित करावे,अशीही मागणी निवेदनात केली आहे. निवेदनाच्या प्रती तालुका प्रशासनालाही देण्यात आल्या आहेत. यावेळी जत सोसायटी चेअरमन मोहन उर्फ भैय्या कुलकर्णी ,एकुंडीचे सरपंच बसवराज पाटील ,समर्थ पतसंस्थेचे संचालक योगेश व्हनमाणे उपस्थित होते.
Blogger द्वारे प्रायोजित.